अकोला दिव्य ऑनलाईन : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त अकोला माहेश्वरी समाज ज्येष्ठ नागरिक संघाचे वतीने आयोजित त्रैमासिक बैठक प्रा.गोपीकिशन कासट यांच्या अध्यक्षतेत महेश भवनात उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाचा प्रारंभ प्रार्थना व दीप प्रज्वलनाने केले. मागील सभेचे इतिवृत्त सचिव प्रा. मुंदडा यांनी प्रस्तुत केले. त्यास मान्यता देण्यात आली. मागील तीन महिन्यात ज्या सदस्यांचा वाढदिवस होता त्यांचा व नवीन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ज्यात शिवप्रकाश गौरीशंकर मंत्री, राजेश चांडक, अँड.मोतीसिंह मोहता, बालकिसन सारडा, प्रा नंदकिशोर राठी, राजीव मुंदडा, रमेश सी बाहेती, प्राचार्य एस.आर बाहेती, चौथमल सारडा, सुभाष डांगरा यांचा समावेश होता.
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये
जलद चालणे स्पर्धा (वय ६०-७०) पुरस्कार प्रायोजक सी.आर जाजू, प्रथम पारितोषिक सिताराम मुंदडा, द्वितीय ओमप्रकाश चांडक, तृतीय नंदकिशोर मालाणी.
जलद चालणे (वय ७० नंतर) पुरस्कार प्रायोजक प्रा.डॉ.एस.आर. बाहेती प्रथम पारितोषिक डॉ. रतनलाल भट्टड, द्वितीय भगवानदास मंत्री, तृतीय ओमप्रकाश सारडा.
संगीत खुर्ची पुरस्काराचे प्रायोजक प्रवीण गिरीधारीलाल मोहता, प्रथम जगमोहन तापडिया, द्वितीय गोपीकिसन जाजू आणि तृतीय ओमप्रकाश हरिकिशन चांडक.
यानंतर प्रमुख अतिथी यवतमाळ येथील प्रसिद्ध साहित्यकार महेश कुमार घनश्याम करवा यांनी ‘जिंदगी का आनंद हर पल’ या विषयावर अतिशय सोप्या भाषेत उद्बोधन केले. त्यामध्ये जिंदगी म्हणजे काय, आनंद म्हणजे काय आणि प्रत्येक क्षणाला आपण कसे आनंदी राहू शकतो, याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात गोपीकिशन कासट यांनी संघाद्वारे यापुढे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्ष गोपीकिशन, कासट सचिव प्रा.राजीव मुंदडा, समाज ट्रस्टचे उपाध्यक्ष शांतीलाल भाला, माजी अध्यक्ष भगवानदास तोष्णीवाल आणि प्रमुख पाहुणे महेश करवा उपस्थित होते.
संचालन प्रा.राजीव मुंदडा यांनी केले. आभार प्राचार्य.डॉ.बाहेती यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदस्य प्रवीण मोहता, सुरेश माहेश्वरी, पुरुषोत्तम मालाणी, ओमप्रकाश कासट, विजय बुलाखीदास राठी, अनुप राठी, राजेश चांडक, डॉ अशोक राठी आदींनी सहकार्य केले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.