Friday, October 18, 2024
Homeताज्या घडामोडीअकोला जिल्ह्यात कॉंग्रेसला धक्का ! माजी आमदार खतीब 'वंचीत' वासी

अकोला जिल्ह्यात कॉंग्रेसला धक्का ! माजी आमदार खतीब ‘वंचीत’ वासी

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत कॉंग्रेस उमेदवार डॉ.अभय पाटील यांनी जोरदार लढत दिल्याने कॉंग्रेस पक्षात नवा उत्साह निर्माण झाला असताना, ऐन निवडणूकीच्या तोंडावर बाळापूर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी आमदार अँड. नातिकोद्दिन खतीब यांनी आज वंचित बहुजन आघाडीत रितसर प्रवेश केला. तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड.प्रकाश आंबेडकर यांनी खतीब यांना उमेदवारी जाहीर करुन कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत बाळापूर विधानसभा मतदारसंघात डॉ. पाटील यांना मताधिक्य मिळाले होते. तेव्हा या मतदारसंघात यंदा चमत्कार घडेल, असे वाटत असतानाच काँग्रेसच्या मवाळ हिंदुत्वावर नाराजीचा सूर लावत, ज्येष्ठ नेते खतीब सय्यद यांच्यासह अन्य 9 मुस्लिम नेत्यांनी काँग्रेस सोडून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. मुस्लिमांचा सहभाग आणि समानतेबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

अँड खतीब यांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेशानंतर आता बाळापूर मतदार संघाचं राजकिय समीकरण पूर्णतः बदललं आहे. या ठिकाणी ठाकरे गटाचे नितीन देशमुख आमदार आहेत. तर मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने आणि नतीकोद्दिन खतीब यांचा सर्वधर्मीयांमध्ये असलेल्या संपर्काने वंचित बहुजन आघडीची या ठिकाणी ताकद वाढली आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघाकरिता वंचित बहुजन आघाडीतर्फे नतीकोद्दिन खतीब यांना उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आल्याने आघाडीचे उमेदवार देशमुख यांना कडवी झुंज द्यावी लागेल असे चित्र दिसत आहे.

दरम्यान माजी आमदार ॲड.नतीकोद्दिन खतीब यांनी मुंबईत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला असल्याने अकोला काँग्रेस मध्ये भगदाड पडले. खतीब यांनी यावेळी काँग्रेसमध्ये राहून समाजाला न्याय देता येत नसल्याची खंत व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!