अकोला दिव्य ऑनलाईन : रामदास पेठ स्थित सन्मित्र पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे व अकोला महानगर टेनिकोईट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या टेनिकोईट खेळामध्ये सन्मित्र पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी १९ वर्षे वयोगटातून प्रथम व विभागीय स्तरावर निवड, १७ वर्षे गटातून द्वितीय आणि १४ वर्षे गटातून तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्याचप्रमाणे सॉफ्ट बॉल मध्येही १९ वर्षे गटातून द्वितीय क्रमांक पटकावत महिला शक्तीचा दबदबा कायम ठेवला आहे.
टेनिकोईट या खेळामध्ये मुलांनीही बाजी मारत १७ वर्षे गटातून प्रथम व विभागीय स्तरावर निवड, १९ वर्षे गटातून द्वितीय,आणि १४ वर्षे गटातून तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्याचप्रमाणे सॉफ्ट बॉल या खेळामध्ये मुलांनी १७ वर्षे गटातून द्वितीय, १९ वर्षे गटातून तृतीय आणि १४ वर्षे गटातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.थ्रो बॉल या खेळामध्ये मुलांनी १७ वर्षे गटातून द्वितीय क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
संस्थेचे अध्यक्ष प्रदिप सिंह राजपूत आणि प्राचार्या मनिषा राजपूत यांनी प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या संघाला चषक देऊन विजयी खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक पंकज गाढे सरांचे अभिनंदन व कौतुक केले. त्यामधून प्रथम क्रमांक प्राप्त संघ विभागीय स्तरासाठी पात्र ठरला आहेत. सर्व विद्यार्थी व पालकांनी विभागीय स्तरासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.