अकोला दिव्य ऑनलाईन : माँ वैष्णवी नवदुर्गा उत्सव मंडळाचा रौप्य महोत्सवानिमित्त अकोल्यातील १०१ महिलांनी सामुहिकपणे १५१ वेळा गाईलेल्या महिषासुर मर्दिनी स्त्रोतांने वातावरण मंगलमय झाले होते. तापडीया नगर येथे विश्व मांगल्य सभा तथा अॅड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प आणि निलेश देव मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात विश्वमांगल्य सभा अकोला शाखेच्या उपस्थित १०१ मातृ शक्तींनी १५१ वेळा महिषासुरमर्दिनी स्त्रोताचे पठन केले.
नवरात्र उत्सव म्हणजे मातृशक्तीचा जागर असून अकोला शहरातील वैभवशाली आध्यात्मिक परंपरेत माँ वैष्णवी नवदुर्गा उत्सव मंडळाचे कार्य निरंतर सुरु आहे. मागिल २६ वर्षापासून माता आदिशक्तीचा जागर येथे अखंडितपणे होत आहे. वात्सल्याचे मूर्तीमंत रूप असलेली देवी माता सर्व भाविक भक्तांचा सांभाळ करीत आहे. आज नवरात्रच्या तिसऱ्या माळेला संध्याकाळी माँ वैष्णवी नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे महिषासुर मर्दिनी स्त्रोत पठन तसेच कुंकुमार्चन महामंगल सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.