अकोला दिव्य ऑनलाईन : सर्व देशाचे लक्ष लागून राहिलेल्या हरियाणा राज्यात आज शनिवार ५ ऑक्टोबरला विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. येत्या ८ ऑक्टोबर रोजी विधानसभेचा निकाल समोर येणार आहे. मात्र, त्याआधी आज एक्झिट पोल समोर आले आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये या निवडणुकीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती, तर भाजपामधील अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे.
न्यूज २४ चाणाक्य :
भाजपा (एनडीए) : १८ ते २४
काँग्रेस (इंडिया आघाडी) : ५५ ते ६२
इतर : २ ते ५
रिपब्लिक टीव्ही-पी मार्क
भाजपा (एनडीए) : १८ ते २४
काँग्रेस (इंडिया आघाडी) : ५५ ते ६२
इतर : २ ते ५
टाईम्स नाऊ :
भाजपा (एनडीए) : २२ ते ३२
काँग्रेस (इंडिया आघाडी) : ५० ते ६४
इतर : २ ते ८
इंडिया टुडे-सी व्होटर्स
भाजपा (एनडीए) : २० ते २८
काँग्रेस (इंडिया आघाडी) : ५० ते ५८
इतर : १० ते १४
कोणत्या एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाला किती जागा?
पीमार्कच्या एक्झिट पोलनुसार, हरियाणात काँग्रेसला ५१ ते ६१ जागा आणि भारतीय जनता पक्षाला २७ ते ३५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच पीपल्स पल्समध्ये काँग्रेसला ४९ ते ६१ जागांवर तर भाजपा २० ते ३२ जागांवर आघाडीवर दाखवलं आहे. तसेच एनडीटीव्हीच्या पोलनुसार काँग्रेसला ५५ आणि भाजपाला २५ जागा मिळू शकतात. तसेच इंडिया टीव्हीच्या पोलनुसार काँग्रेसला ४४ ते ५४ जागा आणि भाजपाला १९ ते २९ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हरियाणात भाजपला धक्का?
हरियाणा विधानसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर आज एक्झिट पोल समोर आले आहेत. विविध एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार हरियाणात भाजपाला धक्का बसण्याची शक्यता आहे, तर २०१४ आणि २०१९ साली काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली होती. मात्र, यावेळी हरियाणात काँग्रेसला एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार जास्त जागा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
एक्झिट पोल म्हणजे काय?
निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याची अनेक माध्यमं असून त्यातील सर्वात विश्वासार्ह माध्यम म्हणून एक्झिट पोलकडे पाहिलं जातं. कारण एक्झिट पोल तंतोतंत नसला तरी निकालाच्या जवळपास जाणारा असतो. एक्झिट पोल हा निवडणुकीचा सर्व्हे असतो. हा सर्व्हे मतदानाच्या काळात केला जातो. वेगवेगळ्या संस्था हा सर्व्हे करत असतात. त्या सर्व्हेच्या आधारे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? याचा अंदाज बांधला जातो. याबरोबरच कोणत्या पक्षाचे किती उमदेवार जिंकणार याचा अंदाज काढला जातो.