अकोला दिव्य ऑनलाईन : हिंदी साहित्य क्षेत्रातील ख्यातनाम साहित्यिक आणि अकोला येथील नूतन हिंदी विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक डॉ. प्रमोद शुक्ला लिखित ‘दोहा रामायण’ चे प्रकाशन नागपूर येथे हिंदी साहित्यातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत देशाचे रस्ते विकास आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. ही राम कथा ॲमेझॉन वर देखील उपलब्ध होणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
सेवा निवृत्ती नंतर अनेक लोक आरामात जीवन जगतात, पण या प्रबळ इच्छाशक्ती असली की उतार वयात देखील जगभरात पोहोचू शकतो हे अकोल्याचे डॉक्टर प्रमोद शुक्ला यांनी दाखवून दिलेले आहे,
रामायण आणि राम कथा ही भारताच्या जनमानसात प्रसिद्ध आहे, तुलसीदास यांनी ‘रामचरित्र मानस’च्या माध्यमातून रामायण घराघरात पोहोचवली आहे, हाच धागा पकडून प्रमोद शुक्ला गुरुजी यांनी दोहा रामायण आता हिंदीत आणले आहे, दोन वर्ष यासाठी परिश्रम घेतले आहे. तब्बल 1109 दोहे सव्वा दोनशे पानांवर लिहून दोहा रामायण तयार आहे,