Saturday, December 21, 2024
Homeराजकारणगडकरींच्या पुढाऱ्यांना कानपिचक्या ! मतदारांनी मत दिले नाही तर एका मिनिटांत सरळ...

गडकरींच्या पुढाऱ्यांना कानपिचक्या ! मतदारांनी मत दिले नाही तर एका मिनिटांत सरळ होतील

अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्रातील दोन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तिकीट वाटपावरून धुसफूस पाहायला मिळत आहेत. युती आणि आघाडीमुळे अनेकांना आपले तिकीट कापले जाईल, ही भीती सतावत आहे. त्यामुळे या पक्षातून त्या पक्षात आता पक्षांतर सुरू झाले आहे. तसेच काही नेते आपल्या मुला-मुलींना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा नेत्यांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपरोधिकपणे टीका केली आहे.

नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलत असताना गडकरी म्हणाले, “कुणाचा मुलगा किंवा मुलगी होणे हे काही पुण्य आणि पापही नाही. पण त्याने किंवा तिने स्वतःला सिद्ध केले पाहीजे आणि लोकांनी म्हणायला हवे की, यांना निवडणुकीला उभे करा. भारतीय संस्कृतीबद्दल बोलत असताना गडकरी म्हणाले की, ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे तत्त्व माननारी आपली संस्कृती आहे. आपण म्हणतो, विश्वाचे कल्याण होवो. आपण कधीच आपले कल्याण, मग आपल्या मुलांचे कल्याण आधी होवो, असे म्हणत नाही. पण राजकारणात काही लोक असे म्हणतात. हे उदाहरण देऊन नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर टीका केली.

घराणेशाहीवर बोलताना ते म्हणाले, नेते आधी आपल्या मुलाला, मुलीला आणि पत्नीला तिकीट मागतात. याचे कारण सांगताना गडकरी म्हणाले की, मतदार या लोकांना मतदान करतात म्हणून ते तिकीट मागतात. ज्या दिवशी मतदार घराणेशाहीतून आलेल्यांना मतदान करणार नाहीत, त्यादिवशी एका मिनिटात सर्व सरळ होतील.

मी ४५ वर्ष राजकारणात आहे. मी कुणाच्याही गळ्यात हार घालत नाही. ४५ या वर्षात माझ्या स्वागताला कुणी येत नाही आणि सोडायलाही येत नाही. मी नेहमी म्हणायचो की, माझ्याबरोबर कुत्रही येत नाही. आता कुत्राही यायला लागला. कारण झेड प्लस सुरक्षा असल्यामुळे मी कार्यक्रमाला जाण्याआधी त्याठिकाणी कुत्रा फिरून येतो. मी कुणाचे पोस्टरही लावत नाही आणि बॅनरही लावत नाही. लोकांनाही सांगतिले आहे, तुम्हाला द्यायचे असेल तर मत द्या. दिले तरी तुमचे काम करणार नाही दिले तरी काम करत राहणार, असे नितीन गडकरी कार्यक्रमात पुढे म्हणाले.

जातीयवाद कराल तर…

नितीन गडकरी यांनी त्यांच्या राजकारणाच्या शैलीबाबतही माहिती दिली. काम करताना कामच करतो. पण जातीयवाद करणाऱ्यांना मी जवळ उभा करत नाही. ते म्हणाले, मी सर्वांना सांगून ठेवले आहे. जातीयवाद करणाऱ्यांना मी उभही करत नाही. “जो करेगा जात की बात, उसको मारूंगा कस के लाथ”, हे मी आधीच जाहीर केले आहे. मला काही फरक नाही पडत, देणारे मत देतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!