Thursday, September 19, 2024
Homeसामाजिकनिलेश देव मित्र मंडळाचा निर्माल्याचे खत हा आदर्शच उपक्रम - आयुक्त डॉ.लहाने

निलेश देव मित्र मंडळाचा निर्माल्याचे खत हा आदर्शच उपक्रम – आयुक्त डॉ.लहाने

अकोला दिव्य ऑनलाईन : निर्माल्याचे खत आणि त्यातून पुन्हा वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. आज ओझोन डे असून या दृष्टीने अकोला सारख्या छोट्या शहरात पर्यावरण संरक्षणाची जागरुकता दिसून येते. निलेश देव मित्र मंडळाने गेल्या चौदा वर्षापासून सुरु केलेला हा उपक्रम महापालिकेचे काम हलके करणारा असून खर्‍या अर्थाने समाजाला दिशा देणारा आहे. त्याच्या या कार्यात महापालिका देखील हातभार लावणार असून त्यांनी या उपक्रमाची खरोखरच समाजाला गरज आहे. असे प्रतिपादन अकोला मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले.

निर्माल्य संकलन करणे आणि त्यांचे खत तयार करणे हे खरोखरच आवश्यक बाब असून यातून जल प्रदूषण टाळण्यास मोलाची मदत होते.धार्मिक परंपरांचे पालन करताना पर्यावरणाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. ‘निर्माल्य कुंभ कलश’ घरचे, सार्वजनिक मंडळांचे, मंदिर परिसरात निर्माल्य कलश निर्माल्य टाकण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा आवाहन केले.

निलेश देव मित्र मंडळ, अ‍ॅड धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प माध्यमातून हा उपक्रम १४ वर्षांपासून सुरू आहे. निर्माल्य कुंभ कलश आज सोमवार पासुन कार्यान्वित करण्यात आला. जठारपेठ भागात वेळेनुसार श्रींच्या चरणी अपर्ण हार, फुले, दूर्वा, बेल, इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी सिध्दीविनायक मंदिर पासुन निर्माल्य कलश रथ कार्यान्वित करण्यात आला.

आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी निर्माल्य रथात टाकत स्थानिकांनी देखील या उपक्रमात सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. यावेळी महापालिका झोन अधिकारी विजय पारतवार, सिध्दीविनायक मंदिराचे व्यवस्थापन व कामकाज अध्यक्ष अँड चन्द्रशेखर जोशी, उपाध्यक्ष प्रभाकर दौड,सचिव निनाद आठवले, अभिजीत परांजपे, विष्णु पाटील,निलेश देव मित्र मंडळाचे प्रमुख जयंत सरदेशपांडे, निलेश देव, अ‍ॅड.गिरीश गोखले, दिलीप देशपांडे, निनाद आठवले, सौ.रश्मी देव, अजय शास्त्री, निलेश पवार, राम उमरेकर, विजय वाघ, राजु गुन्नलवार, राजु कनोजीया, प्रकाश जोशी, नरेश परदेसी, गणेश मैराळ आदींची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!