Saturday, December 21, 2024
Homeताज्या बातम्याअकोला जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात ! ईद-ए-मिलादची सुट्टी आता 18 सप्टेंबरला

अकोला जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात ! ईद-ए-मिलादची सुट्टी आता 18 सप्टेंबरला

अकोला दिव्य ऑनलाईन Eid-e-Milad holiday: ईद-ए-मिलाद निमित्त सोमवारी १६ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेली सुट्टी महाराष्ट्र सरकारने मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात ही सुट्टी रद्द केली आहे. या दोन जिल्ह्यात आता १८ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी असेल. मात्र राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन सुट्टीबाबत निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने शासन निर्णय काढून या निर्णयाची माहिती दिली आहे. यामुळे अकोला जिल्हाधिकारी १६ सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी कायम ठेवला की काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

अनंत चतुर्दशीचा सण मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी येत आहे. यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागात विसर्जनासाठी मोठी गर्दी उसळते. तसेच आदल्या दिवशी ईद-ए-मिलादनिमित्त ठिकठिकाणी मुस्लीम धर्मीयांकडून जुलूस काढण्यात येत असतात. दोन्ही सण लागोपाठ आल्यामुळे काही मुस्लीम धर्मीय नेत्यांनी सोमवार १६ सप्टेंबरला असलेली सुट्टी ही बुधवार १८ सप्टेंबरला जाहीर करण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे केली होती.

समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आणि काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सोमवार १६ सप्टेंबरची शासकीय सुट्टी दिनांक १८ सप्टेंबर रोजी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी द्यावी, अशी मागणी केली होती. नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले की, १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्यामुळे मुस्लीम समाजाने ईद-ए-मिलादचे जुलूस १८ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून दोन्ही समाजाला त्यांचे सण शांततेत साजरे करता येतील.

सलग दुसऱ्या वर्षी मुस्लीम समाजाने जुलूस काढण्यासाठी ईद-ए-मिलादचा दिवस सोडून दुसऱ्या दिवसाची निवड केली आहे. हिंदू आणि मुस्लीम समाजाला शांततेत आपले सण साजरे करता यावेत, तसेच यामुळे गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!