अकोला दिव्य ऑनलाईन : समाजाचे आराध्य श्री सेन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विदर्भ राजस्थानी सेन समाज मंडळ व महिला मंडळ, सेन भाई सेन सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचा शेकडो गरजुंनी लाभ घेतला.
स्थानिक खंडेलवाल भवन येथे आयोजित शिबिरात शुगर, थायरॉईड, डोळे, दांत आणि सर्वसामान्य शारीरिक तपासणी करण्यात आली. जवळपास 300 च्यावर गरजुंची तपासणी करून डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात डॉ.विनय खंडेलवाल, डॉ.प्रियंका खंडेलवाल, डॉ.शिवानी खंडेलवाल, डॉ.जीत श्याम सूनारीवाल, डॉ.राम पाडिया, डॉ सुमित म्हसने यांनी सहभाग घेतला. यावेळी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संस्थापक श्याम सूनारीवाल, वरिष्ठ सदस्य रतनलाल कालोया, नारायण सूनारीवाल, कार्याध्यक्ष ओमप्रकाश सूनारीवाल, गोपाल टाक, उपाध्यक्ष जुगल तूनवाल, नेमकुमार बांगर, मोहन मंगोलिया, राजू तोंदवाल, गोपाल जायलवाल कचरुलाल झडोदीया, गोपाल नारडीया, सुनील जायलवाल, प्रल्हाद चव्हाण, ओमप्रकाश बनभेरु, हरीश राणीवाल, नितीन पिडीयार, निखिल तोंदवाल, रणजित झाडोदीया, कमल भाटी, संजू तोंदवाल, महेश बरबरे, हरीश लीलडे, नरेश राणीवाल तसेच
रवी कालोया,योगेश पवार, गजानन सूनारीवाल,घनश्याम कालोया, राजेश सूनारीवाल विजय सेन, ईशान तोंदवाल, करन तूनवाल, महिला मंडळ अध्यक्षा रेखा टाक, कार्याध्यक्ष सुनीता मांगोलिया, संगीता झाडोदीया, सचिव बबली तोडवाल, शोभा कालोया, कमला सूनारीवाल, ज्योती सुनारीवाल, शीतल मावतवाल, मोना लिलडे, पूनम राणीवाल, जया पिडीयार, पूनम सूनारीवाल, पिंकी सूनारीवाल, बुलबुल तोंदवाल आणि समाजबांधवांनी परिश्रम घेतले.