Wednesday, January 15, 2025
Homeगुन्हेगारीहत्याकांडाचा थरार ! गोळ्यांचा वर्षाव अन् माजी नगरसेवकावर कोयत्याने सपासप वार

हत्याकांडाचा थरार ! गोळ्यांचा वर्षाव अन् माजी नगरसेवकावर कोयत्याने सपासप वार

अकोला दिव्य ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार करत त्यांच्यावर ५ गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली. घरगुती वादातून जवळच्याच व्यक्तीने फायरिंग केल्याचे समजते. गणेशोत्सवाच्या तोंडावरच शहरात पुन्हा गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने कोयत्याने वार केले. ते कोसळल्यावर पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या.

वनराज यांच्यावर निकटवर्तीयाने गोळीबार केला असून, कौटुंबिक वाद तसेच वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आंदेकर यांना उपचा- रासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आंदेकर यांना मृत म्हणून घोषित करण्यात आले. गुन्हे शाखेसह समर्थ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. वनराज आंदेकर हे पुणे महापालिकेच्या २०१७ सालच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्या अगोदर वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या २००७ आणि २०१२ या दोन वेळा नगरसेविका होत्या. वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक होते. वत्सला आंदेकर यांनीदेखील पुणे शहराचे महापौरपद भूषविले आहे.

Oplus_131072

जुन्या गुन्हेगारी टोळ्यांपैकी एक आंदेकर टोळी

पुण्यातील सर्वात जुन्या गुन्हेगारी टोळ्यांपैकी एक असलेली आंदेकर टोळी असून, या टोळीचे म्होरके बंडू आंदेकर आहेत. ते वनराज आंदेकरचे वडील आहेत. आंदेकर टोळी गेली पंचवीस वर्षे पुण्यात गुन्हेगारी कारवाया करीत असून, प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खुनाच्या प्रकरणी बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षाही झाली आहे.

त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न खंडणी मारामारी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीचा म्होरक्या सूर्यकांत आंदेकरविरुद्ध १९८५ पासून खून, खुनाचे प्रयत्न, धमक्या देणे, शस्त्रे बाळगणे, अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे फरासखाना, खडक व समर्थ या पोलीस ठाण्यात, तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आंदेकर- माळवदकर टोळीयुद्धातून झालेल्या खूनप्रकरणात सूर्यकांत आंदेकरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, आंदेकर टोळीवर मोक्का अंतर्गत करवाई करण्यात आली आहे, मोक्काची कारवाई झालेला कुख्यात गुंड बंडू आंदेकरसह सहा जणांना ५ जानेवारी २०२४ रोजी जामीन मिळाला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!