अकोला दिव्य ऑनलाईन : गेल्या २० वर्षात १ लाख कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या पेन्शनचा प्रश्न अनुत्तरीत आहे. हा प्रश्न सोडवायला राज्याचे ऊर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यासाठी आ. रणधीर सावरकर यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कामगार मेळाव्यात तांत्रिक कामगारांच्या समस्यांचा उहापोह करुन पेन्शनचा प्रलंबित प्रश्नावर लक्ष वेधताना महाराष्ट्र राज्य विज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस हाजी सय्यद जहिरोद्दीन यांनी केले.
महाराष्ट्र राज्य विज तांत्रिक कामगार संघटना अकोलाच्या वतीने तांत्रिक कामगारांचा सत्कार व तांत्रिक कामगार मेळावा अकोला येथे संपन्न झाला आहे. अकोला परिमंडळामध्ये नव्याने रुजू झालेले अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरण विंग अध्यक्ष शिरीष इंगोले होते. तर उद्घाटन आमदार रणधीर सावरकर यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस हाजी सय्यद जहिरोद्दीन तर मुख्य अतिथी म्हणून मुख्य अभियंता सुहास रंगारी, उपमुख्य औद्योगिक संबध अधिकारी शेलकर, महापारेषणचे अधीक्षक अभियंता संजय काटकर, कार्यकारी अभियंता जयंत पैकीने, गोरक्षनाथ सपकाळे, जयंत मसने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी सहाय्यक महाव्यवस्थापक मनीष कुमार भोपळे तसेच प्रमुख केंद्रीय पदाधिकारी आर.पी थोरात, लीलाधर धकिते, संतोष वाघमारे, शब्बीर पठाण, अनिल सोळंके, संजय खर्डे, प्रदीप मानकर, अंबादास गुल्हाने, संजय येवतकर, देऊळगावकर, पारिस, दहि मॅडम तसेच संघटनेचे पदाधिकारी एच.टी वसु, रविन्द्र चौखंडे, जावेद खान मेहमूद खान, जितेंद्र गवई, नागेश मुंडे, आसीम अहमद, संतोष तेलगोटे, निलेश वाघ, अंनत पालखेड, निलेश चहाकर, संतोष गवळी, शिवा देशमुख, प्रसन्न बोचरे, विनोद सुलतान, लालबहादूर यादव, शुभम चीम, सुनिल तायडे, सतिष चावरिया, सय्यद इसाखोद्दिन जिलानी, अब्दुल नसीम अ.खलील, अमोल चिंचोळकर , योगेश कोगदे, संतोष आबुस्कार, एस.एस चावरीया, आकाश भगत, धनराज हिवरे, प्रमोद शुक्ला,अशोक सपकाळ, भुषण सुळे, लुकमान भाई, मंगेश टापरे आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी अकोला येथील वृक्ष मित्र विवेक पारसकर यांनी रोपे व वृक्ष उपलब्ध करून दिली. त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रम मध्ये ७० तांत्रिक कामगारांनी संघटनेत प्रवेश घेतला. तसेच १७ कंत्राटी कामगारांनी सुध्दा प्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वासुदेव डांगे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रसन्न बोचरे व सुनिल झेड गवई यांनी केले.