Monday, September 16, 2024
Homeअर्थविषयकअर्थव्यवस्थेला जबरदस्त झटका ! GDP मध्ये मोठी घसरण, विकास दर ६.७ टक्क्यांवर...

अर्थव्यवस्थेला जबरदस्त झटका ! GDP मध्ये मोठी घसरण, विकास दर ६.७ टक्क्यांवर आला

अकोला दिव्य ऑनलाईन : देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. गेल्या पाच तिमाहींपेक्षा यावेळच्या तिमाहीचा विकास दर सर्वात कमी राहिला आहे. एप्रिल-जून या 2024 च्या पहिल्या तिमाहीत विकास दर कमी होऊन 6.7 टक्क्यांवर राहिला आहे. गेल्या वर्षी हाच दर 7.8 टक्के होता. 

चालू आर्थिक वर्षातील देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन पहिल्याच तिमाहीत 6.7 टक्क्यांच्या नीचांकी पातळीवर घसरले आहे. कृषी क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे जीडीपीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. जानेवारी-मार्च या तिमाहीत हाच जीडीपी 7.8 टक्क्यांवर होता. गेल्या आर्थिक वर्षाचा सरासरी विकास दर हा 8.2 टक्के राहिला होता. या आकडेवारीच्या तुलनेत या तिमाहीतील जीडीपी कमालीचा घसरला आहे.

नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे सरलेल्या जुलै महिन्यात आठ प्रमुख पायाभूत क्षेत्रांच्या उत्पादनातील वाढ ६.१ टक्क्यांवर मर्यादित राहिली. त्या आधीच्या जून महिन्यात वाढीचा दर ५.१ टक्के राहिला होता. तर कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, इंधन शुद्धीकरण उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज या प्रमुख क्षेत्रांची वाढ जुलै २०२३ मध्ये ८.५ टक्के होती.

या आर्थिक वर्षात एप्रिल-जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत मुख्य क्षेत्रांचे उत्पादन ६.१ टक्के नोंदवले गेले आहे. जे गेल्यावर्षी याच कालावधीत ६.६ टक्के होते. सरलेल्या जुलै महिन्यात खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन अनुक्रमे (-) २.९ टक्के आणि (-) १.३ टक्क्यांपर्यत घसरले आहे. त्याबरोबरच कोळसा, पोलाद, सिमेंट आणि वीज उत्पादनातील वाढीचा दर अनुक्रमे ६.८ टक्के, ७.२ टक्के, ५.५ टक्के आणि ७ टक्के आहे. मात्र इंधन शुद्धीकरण उत्पादने आणि खतांची उत्पादनात अनुक्रमे ६.६ टक्के आणि ५.३ टक्के वाढ झाली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर सरकारी खर्च कमी झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास मंदावेल, अशी अपेक्षा अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली होती. 

मुडीजने जीडीपीचा अंदाज वाढविला…
देशाचा विकास दर येण्यापूर्वी एक दिवस आधी मुडीजने आपला अंदाज व्यक्त केला होता. डीजने 2024 मध्ये वास्तविक GDP वाढीचा अंदाज 6.8 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, तर 2025 साठी भारताचा विकास दर अंदाज 6.4 टक्क्यांवरून 6.6 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!