अकोला दिव्य ऑनलाईन : विद्यार्थीनी व बालिकांवर होणाऱ्या अत्याचार व शोषणाविरुद्ध विद्यार्थ्यांमध्ये जागृती व सुरक्षा कायदा बद्दल माहिती देण्यासाठी सन्मित्र पब्लिक स्कूल व अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सिंह राजपूत आणि प्राचार्या सौ. मनिषा राजपूत यांच्या मार्गदर्शनात ‘सक्षम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी व बालिकांवर होणाऱ्या अत्याचार व शोषणाविरुद्ध विद्यार्थ्यांमध्ये जागृती व सुरक्षा कायदा बद्दल माहिती देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. अकोला पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे शाळांमधून आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात पोलिस शिपाई गोपाल मुकुंदे, मोनिका भगत व अनिता वारघडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सक्षम,सजग व सुरक्षित कसे राहावे असे मार्गदर्शन गोपाल मुकुंदे यांनी केले.मोबाईल किंवा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तिपासून आपल्याला कसा त्रास होऊ शकतो असे सांगितले. गूड टच व बॅड टच समजावून सांगितले. सुरक्षा व सायबर कायद्याचे स्वरूप व माहिती सांगितली.मैत्रीपूर्ण व विनोदी सवांदामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांबद्दल असलेली भीती निघून गेली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना सजग करणारे व्हिडिओ दाखवण्यात आले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने समयोचित अशी “लेक वाचवा” कविता खानझोडे यांनी सादर केली. कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही विभागात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार खानझोडे व उपश्याम मॅडम यांनी केले.