Monday, September 16, 2024
Homeताज्या बातम्याअकोला मनपा क्लब टेंडरच्या विरोधात उबाठा शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

अकोला मनपा क्लब टेंडरच्या विरोधात उबाठा शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

अकोला दिव्य ऑनलाईन : शासनाकडून नगरोत्थान आणि नागरी दलितवस्ती व नागरी दलितोत्तर या शिर्षात प्राप्त ४० कोटींच्या निधीतील विकास कामे मनपामधील जवळपास २०० च्यावर परवानाधारक कंत्राटदारांना दिली नाही, तर सत्ता पक्षाच्या दबावाला बळी पडून अकोला महापालिका प्रशासनाने क्लब टेंडरच्या नावाने झोन प्रमाणे मर्जीतील 4 मोठ्या कंत्राटदारांना टेंडर देण्याचा प्रयत्न केला, यासाठी अटी शर्तीमध्ये अशी अट टाकली की छोट्या कंत्राटदाराला काम मिळूच शकत नाही.त्यामध्ये प्रामुख्याने स्वतःचा प्लांट आवश्यक आहे. ही जाचक अट आहे. सत्ताधारींचा या मागे स्पष्ट उद्देश आहे की, एकहाती कमिशन मिळाले पाहिजे. सुशिक्षातांना बेरोजगार करण्याचे पाप हे सरकार करीत आहे.असा आरोप करुन आज शुक्रवार ३० ऑगस्टला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेतर्फे तरूण, सुशिक्षित इंजिनिअर ठेकेदार यांच्या हितार्थ ठिय्या मनपा कल्ब टेंडर विरोधात आंदोलन करण्यात आले.

योगायोगाने आज मनपामध्ये आयोगाची चमू पाहणी करीता आली होती. त्यामुळे त्यांना सुद्धा अकोला मनपाच्या भ्रष्ट कारभाराचे जिवंत उदाहरण पाहावयास मिळाले. यावेळी आयुक्तांशी चर्चा करून छोट्या कंत्राटदारांना किमान अर्ध्या निधीची तरी कामे देण्यात यावी.अशी मागणी केली.‌ तेव्हा यामधून काही तरी मार्ग निश्चितच काढतो असे त्यांनी सांगितले. यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.

या प्रसंगी शहरप्रमुख राजेश मिश्रा, उपजिल्हाप्रमुख गजानन बोराळे, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, पूर्व शहरप्रमुख मंगेश काळे, पूर्व शहरप्रमुख राहूल कराळे, गजानन चव्हाण, नितिन मिश्रा महिला आघाडी सुनीता श्रीवास,अनिता मिश्रा, प्रमिला गिते, पुजा मालोकार,शरद तुरकर, सुरेंद्र विसपुते, प्रकाश वानखेडे,पंकज जायले, अभय खुमकर, सागर भारुका, कृष्णा तराळे, सुमेश सारसे, मनोज बागडे, किरण येलोंकर, संजय अग्रवाल, रुपेश ढोरे, शुभम इंगळे, जितेंद्र शर्मा, सागर शर्मा, बबलू श्रीनाथ, विशाल लढ्ढा, कुणाल शर्मा, संतोष दुतोंडे, सतीश नागदेवे, गोपाल लव्हाळे, गणेश बुंदले, पियुष रुमाले, संतोष रणपिसे, श्याम रेडे, सुनील दुर्गेया, लक्ष्मण पंजाबी, राजे इंगळे, रोशन राज, राहुल मुलानी, अजय गोस्वामी, नरेश मोटवानी, राजेश कानापुरे , निलेश वानखेडे, बाळू ढोले, ललित पांडे, बबलू बियाणी, जॉन खबरानी, अजय बालानी, धीरज सरोदे, किशोर गावंडे, पिंटू बोंडे, सतीश वानरे,राहुल मस्के,आकाश राऊत, अमर भगत, नागलकर, मनीष पानझडे, शिवा राऊत, तेजस वराडे, सागर बनकर, शिवा जगदाळे, पवन करमखेडे, राज जावेरी, अजय वानखडे, मनोज भगत, अर्जुन वानखडे, आकाश ठाकूर, अशोक बननेवार, संजू अण्णा फुले लो. प्रमोद धर्माळे, मंगेश खंडेजोर, रवी अवचार, पवन बागेरे, दिपू पांडे, श्याम डाकोरे, अक्षय नागापुरे, गणेश पोलाखडे, गजानन नंदरधने, बबन पवार, सोनू ठाकूर, राधे शर्मा, अनिल शुक्ला, नंदू तायडे, दशरथ मिश्रा, आभास मिश्रा, देवा गावंडे, छोटू भर दिया, गणेश चौधरी, पंकज बाजोड, शुभम वासनकर, चौबेजी, पंकज श्रीवास, चेतन मारवार, रवी श्रीवास, रवी मळावी, गोपाल जाधव, हेमंत मिश्रा, रामराव सोनारगंन, अनिल शुक्ला, सागर देशमुख , आशुतोष मिश्रा, आशुतोष कवळे, शुभम दुबे, आनंद दुबे, तसेच शिवसेना पश्चिम- पुर्वचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना तथा सर्व आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे मीडिया प्रमुख चेतन मारवाल व प्रसिद्धी प्रमुख योगेश गीते यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!