Tuesday, January 28, 2025
Homeसंपादकियमाहेश्वरी प्रगती मंडळाच्या अध्यक्षपदी सुरज काबरा तर सचिवपदी पियूष मालाणी

माहेश्वरी प्रगती मंडळाच्या अध्यक्षपदी सुरज काबरा तर सचिवपदी पियूष मालाणी

अकोला दिव्य ऑनलाईन : सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर आणि तत्पर असलेल्या अकोला येथील माहेश्वरी प्रगती मंडळाच्या वर्ष २०२४-२०२६ या दोन वर्षासाठी नवीन कार्यकारिणी मंडळाच्या निवडीसाठी खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या निवडणुकीत सुरज सत्यनारायण काबरा यांनी अध्यक्षपदाचा निवडणुकीत एक हाती विजय पटकाविला.

अध्यक्षपदासाठी सुरज सत्यनारायण काबरा आणि यश संतोष मोहता हे दोन उमेदवार होते. यामध्ये सुरज सत्यनारायण काबरा यांना 128 मते मिळाली तर यश संतोष मोहता यांना 102 मते मिळाली आणि 26 मतांनी काबरा विजयी झाले. यासोबतच सचिवपदासाठी पीयूष हनुमानदास मालाणी व आनंद गांधी यांच्यात झालेल्या निवडणूकीत पीयूष मालाणी विजयी झाले. कोषाध्यक्षपदी यश अजय बियाणी व अंकेक्षकपदी गजानन सुरेश तोष्णीवाल यांनी विजय प्राप्त केला.उपाध्यक्षपदी संकेत अशोक चांडक, निलेश रमेशचंद्र राठी व सहसचिवपदी आशीष अशोक झंवर, कपिल कमलकिशोर जाजू तर सहकोषाध्यक्षपदावर आयुष अरुण बिसानी या सर्वांची अविरोध निवड केली गेली.

माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजय पनपालियांच्या उपस्थितीत माहेश्वरी भवन येथे पार पडलेल्या निवडणूकीत सीए दिपक मुंदडा, सीए राघव खटोड, सीए श्रीयश भाला, सीए धीरज चांडक, अँड.दिपक लाहोटी व अँड रोशन राठी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज सांभाळले. नवनिर्वाचित कार्यकारिणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना मावळते अध्यक्ष आनंद डागा यांनी शुभेच्छा दिल्या. माहेश्वरी प्रगति मंडळाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष सूरज काबरा व नूतन कार्यकारिणी मंडळाचे बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे सचिव पवन माहेश्वरी तसेच अकोला जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष पंकज टावरी, जिल्हा सचिव आशीष झंवर यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Oplus_131072
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!