Wednesday, January 15, 2025
Homeसांस्कृतिक...जय कन्हैया लाल की ! उद्या सालासर बालाजी मंदिरात जन्माष्टमी उत्सव

…जय कन्हैया लाल की ! उद्या सालासर बालाजी मंदिरात जन्माष्टमी उत्सव

अकोला दिव्य ऑनलाईन : ‘नंद के घर आनंद भयो, जय हो कन्हैया लाल की’ चा गजरात श्री कृष्ण जन्मोत्सव अर्थात गोकुळ अष्टमीचा उत्सव अकोला येथील श्री.सालासर बालाजी मंदिरात उद्या सोमवार २६ ऑगस्टला साजरा केला जातो आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही स्थानिक गंगा नगर परिसरातील मंदिरात श्री.सालासर बालाजी सेवा समितीच्या वतीने या उत्सवात मंदिर परिसरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच रंगीत रोषणाई, फुलांची सजावट, आकर्षक सेल्फी पॉईंट आणि कृष्णाची नौका नयन व झोपाळा झूलतांना कृष्ण, अशा विहंगम झांकी साकार करण्यात आली आहे. या झांकींवर पुष्प वर्षाव देखील करण्यात येणार आहे.

सोमवार दि 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजतापासून भक्तांना दर्शनासाठी सुविधा करण्यात आली आहे. रात्री 10 -30 वाजता पासून कृष्ण जन्मोत्सवास प्रारंभ होणार आहे. या नंतर भक्तांसाठी आरती लढ्ढा कृष्ण जन्मोत्सव गीत सादर करणार आहे.भक्तांसाठी दर्शनाची उत्कृष्ट व्यवस्था असून झांकी, देखावे मंगळवार दि 27 ऑगस्टपर्यंत सुरूआहे. कृष्ण जन्मोत्सवाचा सर्व महिला-पुरुष भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन श्री.सालासर बालाजी सेवा समितीकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!