Friday, November 22, 2024
Homeताज्या घडामोडीMaharashtra Bandh : शरद पवारांचं आवाहन ! उद्याचा बंद मागे घ्या :...

Maharashtra Bandh : शरद पवारांचं आवाहन ! उद्याचा बंद मागे घ्या : कॉंग्रेसची भुमिका जाहीर

“NCP Sharad Pawar : अकोला दिव्य ऑनलाईन : महाविकास आघाडीने उद्या दिलेली महाराष्ट्र बंदची हाक बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा आज मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घ्यावा, असं आवाहन केलं आहे. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा, असं पवार यांनी म्हटलं आहे.

हायकोर्टाच्या निर्णयाविषयी बोलताना शरद पवार यांनी म्हटलं आहे की, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आलं होतं. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. त्यामुळे भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन करण्यात येते, अशा शब्दांत पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

नाना पटोले काय म्हणाले?
न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. यानंतर नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करून आम्ही उद्या काळा झेंडा घेऊन आणि तोंडाला काळी पट्टी बांधून उद्या सकाळी ११ वाजता आंदोलन नाही. मात्र आम्ही एकत्र बसू. यामध्ये आम्ही न्यायालयाचा आदर करू. यासंदर्भातील सूचना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात दिलेल्या आहेत. न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचा विरोध करण्याचं काहीही कारण नाही”, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्यावतीने उद्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं. यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!