Wednesday, January 15, 2025
Homeताज्या घडामोडीतिने चक्क पंतप्रधान मोदींना मागे टाकलं ! पहिल्या क्रमांकावर कोण ? श्रध्दा...

तिने चक्क पंतप्रधान मोदींना मागे टाकलं ! पहिल्या क्रमांकावर कोण ? श्रध्दा कपूर तिसऱ्या स्थानी

अकोला दिव्य ऑनलाईन : चित्रपट तारका श्रद्धा कपूर सध्या तिच्या ‘स्त्री २’ चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि रिलीज होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.या चित्रपटाने एक आठवडा होण्याआधीच जगभरात ३०० कोटींहून अधिक कलेक्शन केले आहे. फक्त ६० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

चित्रपटाच्या यशामुळे आनंदी असणाऱ्या श्रद्धा कपूरच्या आनंदात आणखी भर पडली आहे. कारण ती सोशल मीडियावरही क्वीन बनली आहे. तिने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागे टाकलं आहे. श्रद्धा कपूर चित्रपटांबरोबरच सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती स्वत:शी संबंधित काही ना काही पोस्ट सतत शेअर करत असते. ती इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या कमेंट्सना रिप्लाय देत असते. तिच्या आवडत्या कमेंट्स ती स्टोरीला पोस्ट करत असते. बऱ्याचदा ती चाहत्यांबरोबर स्टोरीच्या माध्यमातून संवाद साधते. चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरंही देते. ‘स्त्री 2’ च्या यशानंतर श्रद्धाच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. तिने पंतप्रधान फॉलोअर्सच्या बाबतीत पंतप्रधान मोदींना मागे टाकलं आहे.

पंतप्रधान सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. इन्स्टाग्रामवर त्याचे ९१.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर श्रद्धा कपूरचे ९१.५ मिलियन फॉलोअर्स झाले आहेत.श्रद्धा कपूरची फॅन फॉलोइंग अशीच वाढत राहिली तर प्रियंका चोप्राला मागे टाकू शकते, त्यानंतर ती दुसऱ्या क्रमांकावर येईल. दोघींच्या फॉलोअर्समध्ये जास्त अंतर नाही. त्यामुळे श्रद्धा प्रियांकाला मागे टाकते की नाही ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

पहिल्या क्रमांकावर कोण?
इन्स्टाग्रामवर कोणत्या सेलिब्रिटीचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत याबद्दल बोलायचं झाल्यास तो कोणताही दाक्षिणात्य किंवा बॉलीवूड स्टार नाही. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli Instagram Followers) आहे. तो पहिल्या क्रमांकावर असून इन्स्टाग्रामवर त्याचे २७० मिलियन फॉलोअर्स आहेत. याच यादीत दुसऱ्या स्थानावर बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra Instagram Followers) आहे. देसी गर्लचे इन्स्टाग्रामव ९१.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पंतप्रधान मोदी होते, आता त्यांना श्रद्धा कपूरने मागे टाकलं आहे. आता श्रद्धा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून मोदी चौथ्या क्रमांकावर आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!