Wednesday, November 20, 2024
Homeताज्या घडामोडीदोन मुलींवर अत्याचार !बदलापुरकरांचे रेल्वे ट्रॅकवर आंदोलन :कल्याण-कर्जत वाहतूक ठप्प

दोन मुलींवर अत्याचार !बदलापुरकरांचे रेल्वे ट्रॅकवर आंदोलन :कल्याण-कर्जत वाहतूक ठप्प

अकोला दिव्य ऑनलाईन : बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी अखेर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकरणी आरोपी अटकेत असला तरी या संपूर्ण घटनेत पोलीस प्रशासनाने जो बेजबाबदारपणा दाखवला त्याप्रकरणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तत्काळ बदली करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि मुलांची नेआण करण्याची जबाबदारी असणाऱ्या सेविकांचे निलंबन केलं आहे.

या घटेनंतर संपूर्ण शहरात याचे पडसाद उमटले आहेत. ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेसमोर नागरिकांनी तथा पालकांनी आंदोलन सुरु केलं आहे. बदलापुरच्या रेल्वे ट्रॅकवर आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. रेल्वे, रिक्षा अडवण्यात आल्या आहेत. कल्याण-कर्जत रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बंदलापूर बंदच्या दरम्यान आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. अप आणि डाऊनवरील वाहतूक ठप्प झाली आहे.शाळेने जारी केलेल्या निवेदनात सध्याचा काळ शिक्षण संस्थेसाठी नाजूक असून या चिमुकल्या मुलींसोबत जो प्रकार घडला तो दुर्दैवी आणि निंदनीय असल्याचं शाळेनं म्हटलं आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकावरील ट्रॅकवर आंदोलन करताना बदलापूरकर

शाळेतील विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वस्वी शाळेचीच असून या घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्यांची तातडीने हकालपट्टी करण्यासोबतच ज्या खाजगी कंत्राटदाराच्या माध्यमातून हा कर्मचारी कंत्राटी पद्धतीने शाळेत काम करत होता, त्या कंत्राटदार कंपनीचा करार रद्द करून काळ्या यादी टाकण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणात शाळेतील सीसीटीव्ही तपासण्याची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापिकांना निलंबित करण्यात आलं असून ज्या वर्गात या चिमुकल्या मुली शिकत होत्या. त्या वर्गाच्या वर्गशिक्षिका आणि लहान मुलींना प्रसाधनगृहात नेआण करण्याची जबाबदारी असलेल्या आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

बदलापूर पूर्वेतील एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतीलच एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला आहे. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. यानंतर पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नसल्याने तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं. याचप्रमाणे आणखी एका मुलीसोबतही सारखाच प्रकार घडल्याची माहिती ही समोर आली. या दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांचा एफआयआर नोंदवून घेण्यात आला नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!