अकोला दिव्य ऑनलाइन : मी भारतीय, आम्ही भारतीय,आपण भारतीय आहोत, असे समर्थच्या मुलांच्या उत्स्फूर्तपणे ओठावर आलेले शब्द ऐकून अभिमानाने हृदय भरुन येते, अशी भावना संस्थाध्यक्ष प्रा.नितीन बाठे यांनी कार्यक्रमाध्यक्ष म्हणून बोलतांना व्यक्त केली.श्री समर्थ पब्लिक शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ द्वारा संचालित श्री समर्थ पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अकोला आणि समर्थ बिझ्झी बीझ, अकोला येथे १५ ऑगस्टरोजी ७८ वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय संविधान म्हणत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने सलामी देण्यात आली. ध्वजारोहणानंतर देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या थोर महात्म्यांचे प्रतिमेला वंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, भाषण ,समूहगीत यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.
कार्यक्रमात शाळेचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे यांनी अध्यक्षीय भाषण आणि मार्गदर्शन करुन देशाप्रती प्रेम व्यक्त केले. कार्यक्रमाला संस्थेचे प्रा.राजेश बाठे, प्रा.जयश्री बाठे, प्रा.किशोर कोरपे, प्रा.किशोर रत्नपारखी, प्रा.योगेश जोशी, डाॅ.जी.सी.राव, शाळेच्या प्राचार्य सुवर्णा गुप्ता, प्राचार्य अश्विनी थानवी, प्राचार्य मुग्धा कळमकर तसेच शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.