Wednesday, January 15, 2025
Homeताज्या बातम्याअकोला : डॉक्टरांच्या संपाने रुग्णसेवा प्रभावित ! मेडिकलमधील शस्त्रक्रियांवर परिणाम

अकोला : डॉक्टरांच्या संपाने रुग्णसेवा प्रभावित ! मेडिकलमधील शस्त्रक्रियांवर परिणाम

अकोला दिव्य ऑनलाईन : शासकीय रुग्णालयाचा कणा असलेले निवासी डॉक्टर सकाळपासून संपावर गेल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.तर शहर व जिल्ह्यातील खाजगी अॅलोपॅथी डॉक्टरांनी देखील आज बंदमध्ये सहभाग घेतल्याने रुग्णांची तारांबळ उडाली आहे. संपातून आपत्कालीन रुग्णसेवा वगळण्यात आली असली तरी ओपीडी, वॉर्ड, नियोजित शस्त्रक्रिया, विविध तपासण्यांची कामे खोळंबली आहेत. उपचारात उशीर होत असल्याचा रुग्णांच्या तक्रारी होत्या. 

कोलकात्याचा ‘आरजी कार’ मेडिकल कॉलेजमधील निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय यंत्रणेकडून निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करण्याचा मुख्य मागणीसाठी निवासी डॉक्टरांची संघटना ‘सेंट्रल मार्ड’ने देशभरात संप पुकारला.या अनुषंगाने अकोला सर्वोपचार, मेडिकलचे निवासी डॉक्टरही सहभागी झाले आहेत.दरम्यान आज सकाळी अकोला शहराच्या मुख्य रस्त्यांवर रॅली काढून निवासी डॉक्टरांनी पीडित महिला डॉक्टरला न्याय मिळावा याकरिता कॅन्डल मार्च काढला यावेळी शेकडो डॉक्टरांनी काळी फित बांधून या घटनेचा निषेध करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

संपाचा रुग्णसेवेला फटका बसू नये म्हणून वरीष्ठ निवासी डॉक्टरांसह, वैद्यकीय अधिकारी, कंत्राटी डॉक्टरांवर विशेष जबाबदारी टाकली होती. असे असतानाही रुग्णांची हिस्ट्री घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यापासून ते डिस्चार्ज देण्याचे काम निवासी डॉक्टर करीत असल्याने ते प्रभावित झाल्याचे दिसून आले. रुग्णसंख्येच्या तुलनेत मोजकेच डॉक्टर काम करीत होते. त्यामुळे उपचारात उशीर होण्याचे प्रमाण वाढले होते. काही विभागाच्या नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान IMA कडून सेंट्रल मार्डच्या संपाला पाठिंबा देत आज १७ ऑगस्टला देशभरात २४ तासांसाठी पुकारलेल्या बंदमुळे अकोला शहरातील रुग्ण तपासणी व उपचार ठप्प झाले आहेत. क्रिटिकल सेंटर वगळता सर्व दवाखाने व रुग्णालये बंद असल्याने ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना फटका बसला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!