Wednesday, November 20, 2024
Homeराजकारणकाँग्रेसला 40 कोटीचा पक्षनिधी ! अर्जात उच्चशिक्षित व महिला-तरुण इच्छुक मोठ्या प्रमाणात...

काँग्रेसला 40 कोटीचा पक्षनिधी ! अर्जात उच्चशिक्षित व महिला-तरुण इच्छुक मोठ्या प्रमाणात : विदर्भ, मराठवाड्यातून सर्वाधिक इच्छुक

अकोला दिव्य ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असून राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून काँग्रेस पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.विशेष म्हणजे यंदा प्रदेश काँग्रेसकडे आलेल्या उमेदवारी अर्जामध्ये उच्चशिक्षित आणि महिला तरुण इच्छुकांचे मोठे प्रमाण आहे. एकुण २८८ मतदारसंघातून २ हजार ५०० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वाधिक इच्छुक विदर्भ आणि मराठवाड्यातील आहेत. उमेदवारी अर्जाबरोबर प्रदेश काँग्रेसला जो पक्षनिधी प्राप्त झाला, त्याची रक्कम सुमारे ४० कोटींपर्यंत गेली आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रदेश काँग्रेसने विधानसभा इच्छुकांना अर्ज पाठवण्याचे आवाहन केले होते. अर्जाची मुदत १० ऑगस्ट पर्यंत होती. प्रदेश काँग्रेसकडे १५०७ तर राज्यातील ३६ जिल्हा समित्यांकडे सुमारे एक हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्या मतदारसंघात काँग्रेसचा विद्यामान आमदार आहे, तेथे इच्छुक कमी आहेत. ५७ राखीव मतदारसंघात इच्छुकांचे प्रमाण अधिक आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातून अधिक संख्येने इच्छुक असून मुंबईतील ३६ मतदारसंघात २०० पेक्षा अधिक इच्छुक आहेत. वर्सोवामध्ये २२ आणि धारावीत १८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. प्रत्येक मतमदारसंघात सरासरी ८ ते १० इच्छुक आहेत. मात्र, राखीव मतदारसंघात इच्छुकांचे प्रमाण १५ ते २० पर्यंत आहे. प्रदेश काँग्रेसकडे आलेल्या उमेदवारी अर्जामध्ये उच्चशिक्षित आणि महिला तरुण इच्छुकांचे यंदा मोठे प्रमाण आहे.

१९८९ पासून प्रदेश काँग्रेस विधानसभा इच्छुकांचे अर्ज मागवते. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभेला इच्छुकांचा अल्प प्रतिसाद होता. त्या तुलनेत यंदा मोठा प्रतिसाद लाभल्याचे प्रदेश काँग्रेस कार्यालयातून सांगण्यात आले. विधानसभा उमेदवारीसाठी खुल्या गटाला २० हजार आणि राखीव व महिला उमेदवारांना १० हजार पक्षनिधी अर्जाबरोबर द्यायचा होता. यंदा उमेदवारी अर्जातून प्रदेश काँग्रेसला किमान ४० कोटी रुपये पक्षनिधी मिळणे अपेक्षित आहे.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून काँग्रेस पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विधानसभेला काँग्रेस १०० पेक्षा अधिक जागांची मागणी आघाडीतील बैठकीत करणार आहे. काँग्रेसकडे सध्या ४५ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे विद्यामान आमदार वगळता ५० ते ६० जागांसाठी इच्छुकांमध्ये मोठी चुरस असणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!