Wednesday, January 15, 2025
Homeगुन्हेगारीअकोल्यातील भाजप नगरसेविका सोनोनेच्या पतीचे क्रोर्य ! माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला ;...

अकोल्यातील भाजप नगरसेविका सोनोनेच्या पतीचे क्रोर्य ! माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला ; प्रकृती चिंताजनक

अकोला दिव्य ऑनलाईन : देशासाठी कारगिल युद्धात आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या अकोला येथील एका माजी सैनिकावर भाजपच्या माजी नगरसेविका पतीने प्राणघातक हल्ला करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बाजोरिया नगरी नालंदा वाचनालय जवळ घडल्याचे समाेर आले आहे. या घटनेत माजी सैनिकाच्या डाेक्यात पाइपने जाेरदार प्रहार केल्यामुळे त्यांना गंभीर स्वरुपाची जखम झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. याप्रकरणी खदान पाेलिस ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेविकेसह त्यांचा पती व इतर साथीदारांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला येथील भाजप नगरसेविकेचा पती व बाजोरिया नगरीतील रहिवासी गजानन सोनोने (५०) मंगेश सावके (३५) गणेश (३५) शंकर चव्हाण (३८) हेमंत हिरोडकर (३६) भाजपच्या माजी नगरसेविका मंगला गजानन सोनोने (४०) अजय सोनोने (२७) प्रज्वल गजानन सोनोने (२५) अशी गुन्हा दाखल झालेल्या आराेपींची नावे आहेत. याप्रकरणातील फिर्यादी व बाजाेरिया नगरी नालंदा वाचनालयजवळ राहणारे भारती बुद्धपाल सदांशिव (४०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,घटनेतील आराेपी फिर्यादीच्या घराच्या आवारभिंतीवर टीनाचा शेडसाठी लोखंडी पाईप रोवण्याचे काम करत होते. ही आमची जागा असल्यामुळे फिर्यादी व माजी सैनिक बुध्दपाल सदांशिव यांनी मनाई केली. यावरुन वाद वाढत जाऊन गजानन साेनाेने यांनी व उपराेक्त आराेपींनी घरात प्रवेश करीत बुध्दपाल यांना शिवीगाळ केली. तसेच अंगावर थुंकत किळसवाणा प्रकार केला. बुध्दपाल यांनी आरोपींना हटकले असता लोखंडी पाईपने डोक्यात व पायावर मारहाण करून गंभीर जखमी केले. बुध्दपाल यांची पत्नी ही वाचविण्यासाठी मधात गेली असता, त्यांनाही मारहाण केली. तसेच यापुढे गाडी खाली चिरडून टाकण्याची धमकी दिली.

याप्रकरणी भारती सदांशिव यांनी १२ ऑगस्ट राेजी दिलेल्या तक्रारीवरुन खदान पाेलिसांनी बीएनएस कलम १०९, १९०, १९१(३),७४,३५१(२),३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!