Thursday, December 26, 2024
Homeसामाजिकविनोदबाबु माहेश्वरी यांचं निधन : आज सायंकाळी अंत्यसंस्कार

विनोदबाबु माहेश्वरी यांचं निधन : आज सायंकाळी अंत्यसंस्कार

अकोला दिव्य ऑनलाईन : जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी व माहेश्वरी समाज भुषण रामगोपालजी माहेश्वरी यांचे पुत्र आणि नवभारत व नवराष्ट्र वृत्तपत्राचे प्रधान संपादक विनोद माहेश्वरी यांचं आज सोमवार १२ ऑगस्ट २०२४ रोजी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७९ वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी रंगादेवी, पुत्र निमिष, सुन अनुपमा, नातु वैभव, नातसून श्रृती आणि राघव माहेश्वरी यांच्यासह मोठे आप्त परिवार आहे. त्याच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शनासाठी माहेश्वरी समाजातील लोकांची तसेच व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांनी त्यांच्या राहत्या निवासस्थानी भेट दिली. प्रखर पत्रकार आणि निष्पक्ष संपादक स्व. रामगोपालजी माहेश्वरी यांचा अकोला शहरासोबत अत्यंत जवळचा व जिव्हाळ्याचा संबंध राहिला आहे. जीवनाच्या सुरुवातीच्या काळात रामगोपालजी हे बृजलालजी बियाणी यांच्या संपर्कात आले आणि त्यांचे विश्वासू सहकारी नव्हे तर जीवाभावाचे मित्र झाले. दैनिक मातृभूमीच्या जडणघडणीत माहेश्वरी यांचा वाटा होता. काही वर्षांनंतर बृजलालजी बियाणी यांच्या मार्गदर्शन आणि पाठबळावर माहेश्वरी यांनी नागपूर येथून हिंदी भाषिक दैनिक नवभारत या वृत्तपत्राचे प्रकाशन सुरू केले. यासोबतच विदर्भ आणि महाराष्ट्रात माहेश्वरी समाजाला संघटित करुन विकासाच्या वाटेवर अग्रसेर करण्यात रामगोपालजी माहेश्वरी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत होते. मात्र बियाणी कुटुंबासोबत त्यांनी शेवटपर्यंत कौटुंबिक संबंध जोपासले होते. याकाळात रामगोपालजी माहेश्वरी यांच्यासोबत अनेकदा हितगुज करण्याची संधी मिळाली होती. विनोद माहेश्वरी यांच्या निधनावर डॉ. राजीव बियाणी यांनी शोक संवेदना व्यक्त केली. तर अकोला शहरातील माहेश्वरी समाजातील अनेकांनी आपल्या संवेदना व्यक्त करुन श्रध्दांजली अर्पण केली.
आज सोमवार १२ ऑगस्टलाच सिवील लाइन येथील ‘नवभारत निकुंज’ निवासस्थानावरुन सायंकाळी ५ वाजता अंत्ययात्रा निघणार असून नागपूर येथील कॉटन मार्केट मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
अकोला दिव्य परिवारातर्फे श्रध्दांजली

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!