Saturday, November 23, 2024
Homeअर्थविषयकसन्मित्र बँक लवकरच 'डिजीटल' होणार ! खेळीमेळीच्या वातावरणात २६ वी आमसभा संपन्न

सन्मित्र बँक लवकरच ‘डिजीटल’ होणार ! खेळीमेळीच्या वातावरणात २६ वी आमसभा संपन्न

Akola Divya : अकोला दिव्य ऑनलाईन : सन्मित्र अर्बन बँकेची २६ वी वार्षिक आमसभा बॅंकेचे अध्यक्ष गोपीकिशन बाजोरिया यांच्या कार्यालयात बँकेचे उपाध्यक्ष सीए रमेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जेष्ठ संचालक व संस्थापक अध्यक्ष डॉ.दिपक केळकर यांच्या उपस्थित पार पडली. सभेमध्ये आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा ताळेबंद, नफा तोटा पत्रक, लेखा परीक्षण अहवाल तसेच ३१ मार्च २०२४ च्या नफ्याचा विनियोजनाला सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. तसेच आर्थिक वर्ष २०२४-२५ यासाठीचे अंदाजपत्र मंजुर केले.
सभासदांनी मागील आर्थिक वर्षात बँकेची एक शाखा खडकी येथे सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त करीत बॅंकेची अशीच उत्तोरोत्तर प्रगती होवो अशी सदिच्छा व्यक्त केली. सभेमध्ये सहकार बोर्डाचे कुमार कांबे यांनी उपस्थित सभासदांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. बँकेचे उपाध्यक्ष रमेश चौधरी यांनी सर्व सभासदांचे स्वागत करून बँकेच्या प्रगतीचा आलेख सभेत ठेऊन यावर्षी देखील बँकेची एक नविन शाखा उघडण्यात येईल असे आश्वासन दिले.

सहकारी बोर्ड, धनंजयराव गाडगीळ प्रशिक्षण संस्था तसेच रिजर्व बँकेचे प्रशिक्षण वेळोवेळी संचालक व कर्मचार्‍यांना देण्यात येत असल्याचे सांगितले. बॅकेचे जेष्ठ संचालक व संस्थापक अध्यक्ष डॉ. दिपक केळकर यांनी सभासदांना बचतीचे महत्व पटवून देत, बँकेच्या प्रगतीला आपला जो हातभार लागला आहे. तसाच हातभार यापुढेही लाभेल अशी अपेक्षा व्यक्ती केली. लवकरच आपली बँकही डिजीटल बँक होईल असे आश्वासन दिले. सभेला संचालक शंकर राघवन, सुभाष केळकर, हरिशचंद्र अग्रवाल, डॉ.प्रद्युन्म शाह, मनोहर सिंगणारे, सी.ए. भुषण जाजु, सतिश अघडते व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. आभार प्रदर्शन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय पाटनकर यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!