अकोला दिव्य ऑनलाईन : शालेय जीवनात अभ्यासासोबतच निसर्ग निरीक्षणाचा छंद जोपासला तर, भविष्यात उत्तम करीअर घडू शकते असे प्रतिपादन अकोला सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक सुरेश वढोदे यांनी केले. सन्मित्र पब्लिक स्कुल येथे निसर्ग कट्टा इको क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर सुरेश वढोदे तसेच सहायक प्राध्यापक डॉ. हर्षवर्धन देशमुख व निसर्गकट्टाचे संस्थापक अमोल सावंत उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात नविन कार्यकारीणी पदाधिकारी यांना निसर्ग दुत बँच लावून करण्यात आली.नविन कार्यकारिणीच्या फलकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सन्मित्र पब्लिक स्कुलचे अध्यक्ष प्रदिप सिंह राजपुत व मुख्याध्यापिका मनिषा राजपुत यांच्या मार्गदर्शनात व निसर्ग कट्टा इको क्लब कॉडिनेटर अपर्णा यादव व साधना बोबडे यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खानझोडे यांनी पर्यावरण व निसर्ग कट्टा या बद्दलची माहिती देताना सांगितली की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शाळेचा एकच ध्यास आहे. तर निसर्ग आपला अविभाज्य घटक आहे, आम्ही जर निसर्गाची काळजी घेतली तर भविष्यामधे तो आपली काळजी घेणार आहे, असे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.कार्यक्रमाचे संचालन तन्वी पळसपगार व रुतूजा बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन त्रिवेणी तायडे हिने केले.