अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला शहरातील संगीतप्रेमी लोकांचा प्रसिद्ध समूह मेलोडीज ऑफ अकोलातर्फे आंतराष्ट्रीय मैत्री दिवसाचे औचित्य साधून ‘तेरे जैसा यार कहा’ या संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून आगळावेगळ्या पद्धतीने मैत्रीदिवस साजरा करण्यात आला. स्थानिक हॉटेलच्या सभागृहात 4 अगस्तच्या संध्याकाळी शहरातील शासकीय अधिकारी, डॉक्टर, सनदी लेखापाल, बांधकाम व्यावसायिक, आरेखक, प्राध्यापक यांनी संगीत गीतं गायन हा धागा पकडून स्थापन केलेल्या मेलोडीज ऑफ अकोला या ग्रुपने फक्त मैत्री वरील विविध गाणी सादर करीत, धमाल ‘मैत्रीदिवस’ साजरा केला.
या संगीतमय मैत्री दिवस कार्यक्रमाला कलाश्रयचे संस्थापक डॉ. राजीव बियाणी, अकोला जनता बँकेचे अध्यक्ष रमाकांत खेतान, लेबेन लाईफ सायन्स कंपनीचे संचालक हरिष शहा, शैलेंद्र पारेख, गिरीश अग्रवाल, अँड.राजू खोत, राजेश भाटी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व मित्रांनी आपल्या मैत्रीचे धागे बंध अधिक घट्ट करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात गजानन शेळके, संजय खडसे, गिरीश शास्त्री, संतोष अग्रवाल, महेंद्र खेतान, अजय सेंगर, मनोज चांडक, विक्रम गोलेच्छा, निधि मंत्री, जयप्रकाश राठी, राजेश पूर्व, आनंद नागले, दीपक चांडक, अतुल आखरे, संजय पिंपरकर, भूषण तजने, महेंद्र टावरी, भारती शेंडे, अनिल तोष्णीवाल, विनीता माहेश्वरी, मंजरी अग्रवाल, रश्मी मेहता यांनी एका पेक्षा एक सरस अशी मैत्रीवर आधारित नावालेली सादर केली.
कार्यक्रमाचे बहारदार संचालन ग्रुपचे संचालक व व्यवस्थापक सनदी लेखपाल मनोज चांडक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सदस्यांनी सहकार्य केले.