अकोला दिव्य ऑनलाईन : आयुर्वेद शिरोमणी आचार्य बालकृष्ण महाराजांचा जन्म दिवस पतंजलि योग परिवार तर्फे जडीबुटी दिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी डॉ सुहास काटे, डॉ.राजेश भोंडे, हरीश माखीजा, हरीश पारवानी, श्रीकांत चाळीसगावकर, प्रदिप बांधवकर,चंद्रशेखर फुलझेले, के.एल.अप्तुरकर व इतर योग साधक उपस्थित होते.
यानंतर रामदास पेठ टिळक पार्क येथे पतंजलि जिल्हा सहप्रमुख हरीश माखीजा यांच्या हस्ते विविध जडीबुटीचे वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. डॉ राजेश भोंडे यांनी प्रत्येक औषधी युक्त झाडांची माहिती, त्याचा उपयोग, वापर,फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. योगाभ्यास घेतला. पाहुण्यांचे स्वागत शब्दसुमनांनी करण्यात आले.
रामदास पेठ टिळक पार्क येथील कार्यक्रमाचे संचालन डॉ.सुनिता कावळे यांनी केले.जेष्ठ साधक मीनाताई गणगणे यांनी आणलेल्या औदुंबर,पारिजात,जांभूळ व इतर विवीध प्रकारचे वृक्षरोपांचे आणले, मान्यवर व इतर साधकांच्या हस्ते टिळक पार्क मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात योग शिक्षक, योग साधक व असंख्य योगप्रेमीसोबत डॉ सुनिता कावळे, सुरेश दरेकर, श्रीकांत चाळीसगावकर , प्रदिप बांधवकर, अशोक राऊत, के.एल.अप्तुरकर, प्रकाश कुलकर्णी, प्रफुल्ल गुप्ते, निलेश जाजु, चंद्रशेखर फुलझेले, डॉ ऋषीता मुनोत, रूपल दोशी, सिमा फुलझेले, प्रतिभा भोजने, साधनाताई चौरसिया, अनुराधा राऊत, वंदना चिंचोळकर, वर्षा ठाकरे, भाविका बाविशी, सुचित्रा पोतदार, वैशाली पागृत, कोमल भगरे, पारुल चौरसिया, क्षितीजा काटे, छाया अग्रवाल, विशाखा राजे, सोनल शहा,नंदाताई बुंदेले, कल्पना गायकवाड, अँड.निर्मला नागदेवे, शिरवळकर ताई, सायली गुप्ते, रेणुका मेश्राम,मंजीरी कुळकर्णी, थोटेताई, चौरसिया, ठाकरे, मेश्राम आणि महीला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुनिता कावळे, रुपल दोशी, श्रीकांत चाळीसगावकर, डॉ ऋषिता मुनोत, प्रदीप बांधवकर, अशोक राऊत , किरण चौक यांनी परिश्रम घेतले.शेवटी शांतीपाठने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.