Thursday, September 19, 2024
Homeताज्या बातम्याBreak....अकोल्यातील UPSC करणाऱ्या विद्यार्थिनीची दिल्लीत आत्महत्या !

Break….अकोल्यातील UPSC करणाऱ्या विद्यार्थिनीची दिल्लीत आत्महत्या !

अकोला दिव्य ऑनलाईन : दिल्लीच्या जुन्या राजेंद्र नगरमध्ये नागरी सेवा परीक्षेची ( UPSC ) तयारी करत असलेल्या अकोला येथील विद्यार्थिनी अंजली हिने परीक्षा आणि खर्चाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तिच्या सुसाईड नोटमध्ये, तिने सरकारला ‘सरकारी परीक्षांमधील घोटाळे कमी करा’ आणि ‘रोजगार निर्माण’ करण्याचे आवाहन केले. तसंच, वाढलेल्या घराच्या भाड्यामुळेही तणावात होती असं या चिठ्ठीतून स्पष्ट होत आहे. युपीएससी परीक्षा पास न होवू शकल्याने आणि वाढलेली बेरोजगारी व महागाई या तीन गोष्टींचा उल्लेख करत तीने आपल्या आयुष्याला कायमचा पूर्णविराम लावलाय.

अंजली मागील एक ते दोन वर्षापासून युपीएससीची तयारी करत होती. दिल्लीतील जुने राजेंद्र नगर इथे अंजली वास्तव्याला होती.२१ जुलैच्या दिवशी अंजलीने भाड्याने राहत असलेल्या घरात स्वत:ला संपवून घेतले. अंजलीने जाताना कुटुंबासाठी एक नोट सुद्धा लिहून ठेवली आहे.यामध्ये आपण इतके टोकाचे पाऊल का उचलतोय याची माहिती तिने घरच्यांना सांगितली आहे.अंजलीने नोटमध्ये लिहले, सॉरी मम्मी, पपा मला माफ करा, मी आयुष्याला कंटाळली आहे.

अंजली हिने आपली व्यथा मांडली, आता भारत सरकार काय करते?

मी आयुष्यात फक्त संकटांना सामोरे जाते आणि आता मला कंटाळा आलाय, मला आता शांती हवीय. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी मी वैद्यकीय उपचार घेतले तरी मला फरक पडत नाही आहे. पहिल्याच वेळेत युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करायची होती पण जमले नाही. सरकारने परीक्षेत होणारे घोळ थांबवावे, देशातील बेरोजगारी रोखा आणि वाढलेल्या महागाईला आळा घालावा असे अंजलीने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.

अंजलीला आईवडिल शिक्षणासाठी पैसे पाठवत होते, अशातच पहिल्याच प्रयत्नात यश न आल्याने अंजली खचून गेली होती तर दुसरीकडे अंजली पीजीने राहत असलेल्या घराच्या भाड्यात सुद्धा वाढ झाली होती. म्हणजे अंजलीला १५ हजारावरुन थेट १८ हजार रुपये द्यावे लागणार होते. याबद्दलची काळजी अजंलीने आपल्या मैत्रिणीकडे बोलून दाखवली होती. तिने नोटमधून सरकारकडे विनंती केली आहे की रोजगार उपलब्ध करुन द्या, खूप तरुण नोकरीच्या शोधात भटकत आहेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे घराचे भाडे कमी केले पाहीजे असे सुद्धा अंजलीने नोटमध्ये लिहले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!