अकोला दिव्य ऑनलाईन : भारत जागतिक आर्थिक महासत्ता होत असून सनदी लेखापालांनी नविन क्षेत्रातील संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन वेस्टर्न इंडिया रिजनल कॉउन्सील मुंबईचे चेअरमन सीए अंकित राठी यांनी केले. अकोला येथील दि.इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउन्टन्स ऑफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल मुंबई येथील पदाधिकाऱ्यांनी अकोला शाखेला भेट दिली असता मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सनदी लेखापाल अकोला शाखाध्यक्ष सीए सुमित आलिमचंदानी यांनी चेअरमन सीए अंकित राठी यांचे पुष्पगुच्छ, भेटवस्तू व स्मृती चिन्ह देऊन स्वागत केले. याप्रसंगी सीए आलिमचंदाणी यांनी अकोला शाखेने केलेल्या कार्याची माहिती दिली. सीए अंकित राठी व पदाधिकारी यांच्या हस्ते सीए फायनलची परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्या नवीन सनदी लेखापाल व त्यांच्या पालकांचा सत्कार केला.
याप्रसंगी डब्ल्युआयआरसीचे उपाध्याक्ष सीए राहुल पारिख, सचिव सीए गौतम लठ, कोषाध्यक्ष सीए पिंकी केडिया व विकासा चेअरमन सीए पियुष चांडक व सदस्य सीए सौरभ अजमेरा उपस्थित होते. यावेळी अकोला जनता बँकेच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल सीए पंकज लदनिया यांचा सत्कार करण्यात आला.
केंद्रिय अर्थसंकल्पातील आयकरातील तरतुदी याविषयावर सीए राधिका खटोड तसेच सीए दिपक अग्रवाल यांनी ‘जीएसटी’ वर तसेच सीए जयराज धवल यांनी ‘टॅक्स ऑडिट रिपोर्टमधिल बदल’ या विषयावरील चर्चासत्रात मार्गदर्शन करून सर्वांच्या शंकाचे निराकरण केले. चर्चा सत्रात अकोला, खामगांव व वाशिम येथील सनदी लेखापाल मोठ्या संख्येत उपस्थिती होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकोला शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. असे जनसंपर्क समितीचे अध्यक्ष सीए रमेश चौधरी यांनी कळविले.