Wednesday, January 15, 2025
Homeसामाजिकउद्या 4 ऑगस्टला शुगर तपासणी शिबिर ! अकोला उबाठा शिवसेनेचा पुढाकार

उद्या 4 ऑगस्टला शुगर तपासणी शिबिर ! अकोला उबाठा शिवसेनेचा पुढाकार

अकोला दिव्य ऑनलाईन : हिंदू ह्र्दय सम्राट बाळासाहेब यांचे 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण हे ब्रीद वाक्य सदैव स्मरणात ठेवून उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांची सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून वाटचाल सुरू आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून अकोला पश्चिम मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मोफत शुगर तपासणी व रोगनिदान शिबिर आयोजन करण्यात आले आहे.

पांडुरंग भिरड मंगल कार्यालय, ज्ञानेश्वर नगर, डाबकी रोड येथे उबाठा अकोला पश्चिम शिवसेना, प्रा.प्रकाश डवले व मानव सेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ४ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित या शिबिरात सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत उपाशीपोटी शुगर तपासणी केली जाईल आणि त्यानंतर दुपारी १२ ते १ या वेळेत जेवणानंतरची शुगर तपासणी करण्यात येणार आहे. या दोन्ही तपासणीचा रिपोर्ट संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत देऊन, याच ठिकाणी रात्रीला ७ वाजेपर्यंत तज्ञ डॉक्टरांकडून रोग निदान व उपचार सल्ला दिला जाणार आहे.

Oplus_131072

कार्यक्रमाला आ. नितिन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, महिला जिल्हा संघटिका देवश्री ठाकरे, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, जिल्हा संघटक डॉ. विजय दुतोंडे, उपजिल्हाप्रमुख गजानन बोराळे, शहरप्रमुख राजेश मिश्रा, महिला शहर संघटिका मंजुषा शेळके व संघटक अनिल परचुरे यांच्या प्रमुख उपस्थितीसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अकोला पश्चिम मधिल नागरिक गरजुंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अकोला जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने प्रा.प्रकाश डवले, अतुल पवनीकर व गजानन बोराळे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!