Friday, November 22, 2024
Homeताज्या घडामोडीचर्चेतील 'पूजा' ला मोठा झटका ! UPSC चा मोठा निर्णय ; भविष्यात...

चर्चेतील ‘पूजा’ ला मोठा झटका ! UPSC चा मोठा निर्णय ; भविष्यात यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षेस बसण्यास बंदी : Pooja Debarred from UPSC Exams

अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशभरात मागील महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या पूजा खेडकर यांची उमेदवारी UPSC ने अखेर रद्द केली आहे. आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाील गैरवर्तन व त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली कथित अनियमितता या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांची उमेदवारी यूपीएससीनं रद्द केल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. विशेष म्हणजे यापुढे यूपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये पूजा खेडकर यांना बसता येणार नाही, असंही यूपीएससीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे यूपाएससीनं त्यांच्यावर ही कारवाई केलेली असताना दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अद्याप पतियाला कोर्टानं निर्णय दिलेला नाही.

पूजा खेडकर यांच्या उमेदवारीबाबत UPSC ने केलेल्या कारवाईबाबत एएनआयनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये माहिती दिली आहे. ‘यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांना देण्यात आलेली प्रोव्हिजनल उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. तसेच, यापुढील काळात यूपीएससीकडून घेण्यात येणारी कोणतीही परीक्षा त्यांना कधीच देता येणार नाही, असं यूपीएससीकडून सांगण्यात आलं आहे’, अशी माहिती एएनआयच्या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.

नव्या अध्यक्षांनी पदभार घेण्यापूर्वीच कारवाई
दरम्यान, पूजा खेडकर प्रकरण चर्चेत आल्यानंतर यूपीएससीच्या नेतृत्वामध्ये बदल करण्यात आले होते. त्यानुसार १९८३ च्या बॅचच्या कर्नाटक काडरच्या सनदी अधिकारी प्रीती सुदान यांची UPSC च्या चेअरपर्सन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी म्हणजेच १ ऑगस्ट रोजी प्रीती सुदान पदभार स्वीकारणार आहेत. मात्र, त्यांनीपदभार स्वीकारण्याच्या आदल्याच दिवशी पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीनं कारवाईचा बडगा उगारला आहे. यूपीएससीच्या चेअरपर्सन होणाऱ्या सुदान या फक्त दुसऱ्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. याआधी १९९६ साली आर. एम. बॅथ्यू यूपीएससीच्या चेअरपर्सन म्हणून नियुक्त झाल्या होत्या.

नेमकं प्रकरण काय?
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तन केल्याचा ठपका पूजा खेडकर यांच्यावर आधी ठेवण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं. पुढे पूजा खेडकर यांनी सनदी सेवेत निवड होताना त्यांच्या दिव्यंगत्वाबाबत चुकीची कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप करण्यात आला. शिवाय, त्यांच्या वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही त्यांनी ओबीसी क्रिमी लेअर सुविधेचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, यासाठी त्यांनी परीक्षेसाठी अर्ज करताना नावामध्येही वारंवार बदल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी याचबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा उल्लेख न्यायालयातील सुनावणीमध्ये करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!