अकोला दिव्य ऑनलाईन : देशांतर्गत स्टॉक मार्केट गेल्या आठवड्यात शुक्रवारी, ८०,१५८.५ अंकांवर बंद झाला तर सोमवारी सकारात्मक सुरुवातीसह ओपनिंग केली. आज आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे २९ जुलै रोजी बाजार उघडताच सेन्सेक्सने ८१,६७९ अंकांचा सर्वकालीन उच्चांक गाठला तर निफ्टी २५ हजारांच्या दिशेने अग्रेसर असून २४,९४३ ऑल-टाइम उच्चांकावर ओपनिंग केली. सध्या सेन्सेक्स ३०० हून अधिक अंकांच्या वाढीसह ८१,६५४० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याचवेळी, निफ्टी देखील १०० पेक्षा जास्त अंकांनी वाढून २४,९५० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. सेन्सेक्सच्या ३० समभागांपैकी २४ वधारले असून सहा स्टॉकमध्ये पडझड नोंदवली गेली तर निफ्टीच्या ५० पैकी ४८ तेजीत तर केवळ दोन स्टॉक घसरत आहेत.निफ्टीवरील सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान श्रीराम फायनान्स, डिव्हिस लॅब्स, अपोलो हॉस्पिटल्स, भारती एअरटेल आणि सिप्ला शेअर्स टॉप गेनर्स ठरले तर ओएनजीसी, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि नेस्ले इंडियामुळे गुंतवणूकदारांना फटका सहन करावा लागत आहे.
आठवडाभर कसा असेल मार्केटचा मूड
देशांतर्गत बाजारात सध्या तिमाही निकालाचे सत्र सुरू असून सोमवारीही अनेक मोठ्या कंपन्या जून तिमाहीचे निकाल जाहीर करतील. नवीन सुरुवातीच्या आठवड्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा स्टील, ITC, टाटा कंझ्युमर, टाटा मोटर्स, टायटन कंपनी, कोल इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज या महत्त्वाच्या कंपन्या आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जारी करतील. याशिवाय आठवडाभर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, गेल इंडिया, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, इंडस टॉवर्स, ACC, अंबुजा सिमेंट्स, झोमॅटो, भेल, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस, डाबर इंडिया, इमामी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, कोलगेट पामोलिव्ह, CSB बँक, इंडियन बँक, क्वेस कॉर्प, डिक्सन टेक्नॉलॉजीज, एक्साइड इंडस्ट्रीज, जिंदाल स्टेनलेस, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, टोरेंट पॉवर, वरुण बेव्हरेजेस, गोदरेज प्रॉपर्टीज, मॅनकाइंड फार्मा, झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेस, एस्कॉर्ट कुबोटा, एलआयसी हाउसिंग फायनान्स, यूपीएल आणि अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी देखील तिमाहीतील कामगिरी जारी करतील.