Tuesday, January 28, 2025
Homeराष्ट्रीय'मनू'ने रचला इतिहास ! नेमबाजीत भारताला मिळवून दिले पहिले पदक

‘मनू’ने रचला इतिहास ! नेमबाजीत भारताला मिळवून दिले पहिले पदक

अकोला दिव्य ऑनलाईन : ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकेरने इतिहास रचत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत भाकरे हिने कांस्यपदक जिंकले. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे. नेमबाजीत भारताच्या मनू भाकेरने कांस्य पदक जिंकत यंदाच्या ऑलिम्पिक २०२४ मधील पहिले पदक पटकावून दिले आहे. पॉईंट १ गुणाने मागे राहिल्याने मनू भाकेरला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.कोरियाच्या नेमबाजाने आघाडी मिळवली. मनू भाकेरने अंतिम सामन्यात २२१.७ गुणांसह हे पदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. मनू भाकेर २१व्या शॉटने दुसऱ्या स्थानावर पोहोचली होती, पण अखेरीस ती तिसऱ्या स्थानावर राहिली. कोरियाच्या दोन्ही नेमबाजांनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. मनू भाकेर ही भारताला नेमबाजीमध्ये भारताला पदक जिंकवून देणारी पहिली महिला नेमबाज ठरली आहे. सुरूवातीपासूनच मनू दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी कायम होती पण अवघ्या एका पॉईंटने मनू मागे राहिली. पण तिने भारताला पदक पटकावून दिलं.

कोण आहे मनू भाकेर?
मनू भाकेर हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावातील रहिवासी आहे. २०१८ आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत मनूने भारतासाठी दोन सुवर्णपदके जिंकली होती. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती सर्वात तरुण भारतीय महिला नेमबाज राहिली आहे. वयाच्या १६ व्या वर्षी मनूने २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी दोन सुवर्णपदके जिंकली. तिच्या पिस्तूलमध्ये बिघाड झाल्यामुळे ती टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदक जिंकू शकली नाही.

मनूने ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि ७० राष्ट्रीय पदके जिंकली आहेत. २०२१ च्या ऑलिम्पिकमध्ये ती सातव्या स्थानावर राहिली. २०२३ मध्ये मनूने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अनेक वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेणारी २२ सदस्यीय भारतीय नेमबाजी संघातील ती एकमेव खेळाडू आहे. हरियाणातील झज्जर येथे जन्मलेल्या मनू भाकरने शालेय जीवनात टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंगसह अनेक खेळांमध्ये भाग घेतला. बॉक्सिंग खेळताना मनूच्या डोळ्याला दुखापत झाली. यानंतर तिचा बॉक्सिंगमधील प्रवास संपला. त्याचबरोबर, मनूला इतरही वेगळ्या खेळांची आवड होती, ज्यामुळे ती एक उत्कृष्ट नेमबाज बनण्यात यशस्वी झाली. आता तिने देशासाठी पदक जिंकलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!