अकोला दिव्य ऑनलाईन : श्री समर्थ पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयास सत्र २०२२- २३ आणि २०२३-२४ चे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे प्रोत्साहन पुरस्कार अनुदान ६२ हजार,६५४ रुपये तसेच सत्र २०२३-२४ चे प्रोत्साहन पुरस्कार अनुदान १ लाख ४६ हजार १९४ रूपये प्राप्त झाले. श्री समर्थ शाळा व महाविद्यालय या अनुदानासाठी पात्र ठरले आहे. हा प्रा.नितीन बाठे यांच्या विद्यार्थ्यांप्रती शिक्षण क्षेत्रातील असलेल्या समर्पित भावनेचाच सन्मान असल्याची भावना संस्थेच्या संचालिका प्रा.जयश्री बाठे यांनी व्यक्त केली.
नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन सभागृहात पुरस्कार अनुदानाचा धनादेश एनसीसीचे कर्नल सी.पी. भदोला यांच्या हस्ते व जिल्हा क्रीडा अधिकारी सतिशचंद्र भट यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. संस्थेच्या व शाळेच्या वतीने सदर पुरस्कार धनादेश संस्थेच्या संचालक प्रा.जयश्री बाठे यांच्यासह प्राचार्या सुवर्णा गुप्ता, प्राचार्या अश्विनी थानवी, शारीरिक शिक्षण समन्वयक मयुर निंबाळकर, विनित तिवारी, अंकुश ढोले,आरती सोनोने यांनी स्वीकारला.त्यानंतर शाळेमध्ये संपूर्ण क्रीडा विभागाचा संस्थेचे शिक्षण संचालक डाॅ.जी.सी.राव यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी,अकोला यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरणान्वये शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये वयोगट १४,१७,१९ या वर्षातील शाळा व कनिष्ठ महाविद्यायातील मुला- मुलींचा जास्तीतजास्त सहभाग असावा, याकरिता त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हास्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये सर्व खेळांसाठी व सर्व वयोगटातील कामगिरीचा विचार करून गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे प्रोत्साहन पुरस्कार अनुदान देण्याची योजना शासनातर्फे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन १४,१७,१९ वर्षे मुले- मुली वयोगटात सत्र २०२२-२३ व २०२३-२४ अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभागी नोंदवून प्राविण्य प्राप्त केले.