Sunday, November 24, 2024
Homeताज्या बातम्यासहकार पॅनलचा एकहाती विजय : ज्ञानचंद गर्ग यांना सर्वाधिक मत !

सहकार पॅनलचा एकहाती विजय : ज्ञानचंद गर्ग यांना सर्वाधिक मत !

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला जनता बँकेच्या २०२४-२०२९ या कालावधीसाठी नवीन संचालक मंडळ निवडण्यासाठी सर्व साधारण मतदारसंघाच्या निवडणूकीत जनता सहकार पॅनलने सहजपणे एकहाती विजय पटकाविला आहे. जनता बॅंकेचे निवर्तमान अध्यक्ष ज्ञानचंद गर्ग यांना सर्वाधिक 10 हजार 937 मते मिळाली असून या बॅंकेचे माजी संचालक व उपाध्यक्ष आशिष लोहिया यांनी 1830 मते पटकाविली आहे.तर 750 मते अवैध ठरविण्यात आली.

अकोला जनता बॅक संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्व साधारण मतदारसंघातील निवडणुकीत 14 उमेदवारांमध्ये 13 जागांसाठी 24 जुलैला अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या मतदानात एकूण 68 हजार 692 भागधारकांपैकी अवघ्या 12 हजार 224 सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सरासरी 18 टक्के झालेल्या मतदानाच्या मोजणीला काल गुरुवार 24 जुलैला अकोला येथील वर्धमान भवन येथे सकाळी 11 वाजता सुरुवात करण्यात आली. एकुण झालेल्या 12 हजार 224 मतांमध्ये तब्बल 750 मते अवैध झाली.यानंतर वैध ठरविण्यात आलेल्या 11 हजार 474 वैध मतांची एकुण चार फेऱ्यांमध्ये रात्री उशिरा मोजणी पुर्ण झाली.

फोटोचा उजव्या बाजूकडून ज्ञानचंद गर्ग, रमाकांत खेतान, अनिल अग्रवाल या क्रमाने आहे

जनता सहकार पॅनलचे उमेदवार व निवर्तमान अध्यक्ष ज्ञानचंद गर्ग यांनी सर्वाधिक 10937 मते पटकाविली. त्या खालोखाल माजी अध्यक्ष व निवर्तमान संचालक रमाकांत खेतान (10924) तसेच निर्वतमान संचालक अनिल अग्रवाल (10917), माजी संचालक शैलेंद्र कागलीवाल (10902), शिवप्रकाश मंत्री (10839), निवर्तमान संचालक संतोष गोळे (10819) तसेच विप्लव बाजोरिया (10804), सुभाष तिवारी (10798),पंकज लदनीया (10783), साकरचंद शाह (10738), सुनील तुलशान (10739) भरत व्यास यांना (10356) आणि महेंद्र गढ़िया यांना (10100) मते मिळाली आहे. या निवडणुकीत जनता सहकार पॅनलच्या निवडणूक आलेल्या 13 उमेदवारांमध्ये शिवप्रकाश मंत्री, पंकज लदनिया आणि भरत व्यास हे 3 उमेदवार नवीन आहेत. मात्र काल रात्री याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

जनता सहकार पॅनलच्या 13 सदस्यांच्या विजयाची आणि अविरोध असलेल्या 5 सदस्यांच्या अविरोध विजयांची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडून आज शुक्रवार 26 जुलै रोजी करण्याची शक्यता आहे. नवनिर्वाचित 18 सदस्यांचे रितसर संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर पुढील अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे.






RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!