Thursday, January 2, 2025
Homeगुन्हेगारीमूर्तिजापूरात २६ वर्षीय मुलीची निघृण हत्या ! प्रियकर फरार

मूर्तिजापूरात २६ वर्षीय मुलीची निघृण हत्या ! प्रियकर फरार

अकोला दिव्य ऑनलाईन : मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या संत गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागील एका घरात परप्रांतीय २६ वर्षीय मुलीची तिच्याच सहकाऱ्याने निघृण हत्या केल्याची घटना आज २४ जुलै रोजी उघडकीस आली.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आरोपीला शोधण्यासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर येथील प्रतीक नगर येथील गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे एका घरात परप्रांतीय २६ वर्षीय युवतीची निघृण हत्या करण्यात आली, सदर घटना ही मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. मृतक युवतीचे नाव शांतीक्रिया प्रशांत कश्यप (वय२६) असून आसाम राज्यातील आहे. सदर युवती ही आरोपी चेतन उर्फ सन्नी महादेव शृंगारे सोबत मुंबई येथून आल्याचे समजते, दोन दिवसांपूर्वी चेतन व शांतीक्रिया हे दोघ येथील वैशाली वाईनबारवर काम मागण्यासाठी आले होते.

रात्रीच्या वेळी शुभम महाजन यांनी एका घरांतील काही खोल्यात मुक्कामी असलेल्या वाईनबारवरील इतर कामगारांसोबत या दोघांना मंगळवारी रात्रीच्या वेळी एक खोली मुक्कामाला दिली.आज बुधवारी पहाटे हे दोघेही झोपेतून उठले नसल्याने बाजूच्या खोलीत झोपलेल्या कामगारांनी बघितले असता शांतीक्रिया ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. तिच्या सोबत असलेल्या चेतनने हत्या केल्याचे समोर आले. रात्रीच्या वेळी चेतनने तिच्या डोक्यात वार करुन झोपेतच काटा काढला.आरोपीच्या शोधात पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!