Sunday, September 8, 2024
Homeताज्या बातम्याउबाठाचे आंदोलन ! दररोज जवान शहीद होत असताना मोदी सरकार काय करते...

उबाठाचे आंदोलन ! दररोज जवान शहीद होत असताना मोदी सरकार काय करते ?

अकोला दिव्य ऑनलाईन : जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत कॅप्टन ब्रिजेश थापा, नायक डी. राजेश, जवान ब्रिजेंद्र तसेच अजय शहीद झाले. देसा वनक्षेत्रात धारी गोटे उरबागी येथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू पोलिसांच्या विशेष पथकाने शोधमोहीम सुरु केली. दहशतवाद्यांनी पथकावर गोळीबार करून पळ काढला. दाट झाडी व प्रतिकूल वातावरणात कॅप्टन थापा यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी झालेल्या चकमकीत पाच जवान गंभीर जखमी झाले. त्यातील चौघांना वीरमरण आले.

दहशतवादी सीमेपलीकडून आले, एक-दोन महिने जंगलात लपून होते. अशी माहिती आता समोर येत आहे. तेव्हा प्रश्न उपस्थित होते की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल काय करतात? नरेंद्र मोदी यांना विश्व गुरू आणि जागतिक नेता म्हणून घेण्यात धन्य होणारे आज गप्प का ? असा संतप्त सवाल करत बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज अकोल्यातील मदनलाल धिंग्रा चौकात मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अकोला उबाठा शिवसेनेतर्फे महिला संपर्कप्रमुख वैशाली घोरपडे यांच्या नेतुत्वात निर्दशने करण्यात आली.

यावेळी महिला जिल्हा संघटिका देवश्री ठाकरे, निवासी उपजिल्हाप्रमुख पवनीकर, शहरप्रमुख राजेश मिश्रा, राहूल कराळे, उपजिल्हाप्रमुख गजानन बोराळे, मंगेश काळे, तालुकाप्रमुख नितिन पाटील ताथोड, सुरेंद्र विसपुते, उपजिल्हा संघटीका सुनिता तिजारे, सुनिता श्रीवास, शहर संघटिका वर्षा पिसोडे, युवाजिल्हाप्रमुख अभिषेक खुमकर, संजय भांबेरे, छोटू खांदेझोड, तायवाडेकाका, प्रमोद धर्माळे, अन्ना पिरुऊललेसह अंसख्य शिवसैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!