अकोला दिव्य ऑनलाईन : विदर्भातील ख्यातनाम मल्टीस्टेट शेड्युल बॅंकेचा दर्जा प्राप्त अकोला जनता कमर्शियल को-ऑप बॅंकेचा वर्ष २०२४ ते २०२९ या पाच वर्षांकरीता नवीन संचालक मंडळ निवडीसाठी निवडणूक कार्यक्रमांतर्गत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटच्या दिवशी सर्वसाधारण श्रेणी, महिला, शाखा प्रतिनिधी आणि मागासवर्गीय अशा ४ मतदारसंघातून तब्बल ६५ उमेदवारी अर्ज दाखल केले गेले आहेत. उद्या गुरुवार १८ जुलैला दाखल झालेल्या अर्जांची छाननी करण्यात येणार असून १८ आणि १९ जुलै असे दोन दिवस उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
संचालक मंडळाच्या १८ सदस्यांमधून सर्वसाधारण श्रेणीतून तब्बल १३ सदस्यांची निवड केली जाते. या श्रेणीत बॅकेचे वर्तमान अध्यक्ष ज्ञानचंद गर्ग, माजी अध्यक्ष व संचालक रमाकांत खेतान यांच्या सोबतीने वर्तमान संचालक अनिलकुमार अग्रवाल, सुनील तुलशान, गुरुमुखसिंग गुलाटी, सुभाष तिवारी, संतोष गोळे, विप्लव बाजोरिया, साकरचंदभाई शाह, ईश्वरभाई साकरचंद शाह, महेन्द्र गढीया, वर्तमान शाखा प्रतिनिधी माणिक धुत आणि माजी संचालक शैलेंद्र कागलिवाल, शिवप्रसाद मंत्री आणि नव्याने आलेले भरतकुमार व्यास यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर माजी उपाध्यक्ष आशिष लोहिया तसेच अशोक बालचंद लोहिया, अरविंद धानुका, सुमित सुभाष खंडेलवाल, सुभाष गणपतलाल खंडेलवाल, चेतन रामभाऊ गवळी, विजय पांडुरंग कटाले, लतिका शशिकांत राठी, रितेश गोयनका, प्रा. जयंत बोबडे, अँड.रमेशचंद्र श्रावगी, पकंज लदनिया, किशोर गोयनका, किरण बजाज, संजय कवळे, सतपालसिंग एललकार यांनीही अर्ज दाखल केले आहेत. यावेळी अशोक काबरा, प्रा.के.जी.देशमुख व डॉ.सतिश राठी यांचा उमेदवारी अर्ज नाही.
शाखा प्रतिनिधी श्रेणीतून २ सदस्यांच्या निवडीसाठी माणिक धुत, गुरुमुख सिंग गुलाटी (दोन अर्ज) आणि लतिका शशिकांत राठी या तिघांनी अर्ज दाखल केले.
महिला प्रवर्गातून २ सदस्यांची निवड करावयाची असून पुष्पाताई गुलवाडे, मिनाक्षीबेन नानुभाई पटेल, मनोरमा सुरेन्द्र पाराशर,सुरेखा मनोज खंडेलवाल, श्रीया मनोज खंडेलवाल आणि लतिका शशिकांत राठी असे ६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अनुसुचित जाती जमाती श्रेणीतील १ सदस्य निवडून देण्यासाठी सतपालसिंग एललकार, साहेबराव गवई, प्रमोद आठवले यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा उपनिबंधक प्रविण लोखंडे कामकाज बघत असून, उद्या दाखल उमेदवारी अर्जांची छाननी करून, अर्ज मागे घेण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला आहे. अंतिम उमेदवारांची यादी २१ जुलैला प्रकाशित करण्यात येईल. जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमात मतदानाची तारीख २४ जुलै ठेवून आहे.