अकोला दिव्य ऑनलाईन : शेवटच्या श्वासापर्यंत समाजकार्यात सदा अग्रेसर राहिलेले स्व. सत्यनारायण रांदड यांनी स्थापन केलेल्या सेवाश्रय या संस्थेच्या अखंड दृष्टिदान महायज्ञ शिबिरांतर्गत गोरगरीब व गरजू नेत्र रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दमानी नेत्र अस्पताल यांच्या सहकार्याने स्वर्गीय विमलकुमार गोयनका यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुरुवार 23 जुलाई 2024 रोजी दुपारी 3.30 वाजता माहेश्वरी भवन राधाकिसन प्लॉट अकोला येथे हे शिबीर आयोजित केले आहे.
शिबिरासाठी फक्त गोरगरीब व गरजू रुग्णांनीच नोंदणी करावी. आर्थिक दृष्टीने सक्षम व्यक्तींनी या शिबिरात कृपया नोंदणी करू नये असे आवाहन आयोजकांनी केले आहे. रुग्णांनी 30 रुपये भरून नोंदणी माहेश्वरी भवन कार्यालयात करावी. या शिबिरात फक्त 250 रुग्णांची नोंदणी करण्यात येतील आणि नोंदणी पावती नंबर प्रमाणेच तपासणी करण्यात येईल याची रुग्णांनी नोंद घ्यावी. रुग्णांची तपासणी दमानी नेत्र अस्पतालचे नेत्रतज्ञ डॉक्टर मनीष हर्षे करतील. शिबिरात 50 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांनी नोंदणी करावी. या शिबिरात फक्त मोतीबिंदूंची शस्त्रक्रिया करण्यात येईल. इतर शस्त्रक्रिया या शिबिरात होणार नाही. याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रकल्प प्रमुख नारायण भाला व सेवाश्रयाचे संचालक अँड.ईश्वर गट्टानी, श्यामसुंदर मालपाणी, मनोहर खंडेलवाल, कमलकिशोर अग्रवाल, डाॅ. श्रीकांत मालपाणी, प्रदीप खंडेलवाल, संजीव पारेख, अनिलकुमार भूतडा, प्रकाश बिलाला, राकेश गोड़ा, संजय खत्री, जुगलकिशोर तापडिया व विजयकुमार रांदड यांनी केले आहे.