अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्रासह सध्या देशभरात चर्चेतील आयएएस अधिकारी पुजा खेडकर यांची वाशिम येथून अकोला येथे बदली करण्यात आली आहे. अकोला येथील आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून त्या आठवडाभर कामकाज प्रशिक्षणासाठी हजर होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अकोला शहरात उद्या सोमवार 15 जुलैपासून खेडकर रूजू होत असून 19 जुलै पर्यंत अकोला येथील प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग म्हणून त्या आठवडाभर कामकाज प्रशिक्षण करिता हजर होणार आहे. त्यानंतर 22 जुलै पासून विविध शासकीय अधिकारी यांची भेट घेऊन कामकाजाचा अनुभव घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुजा खेडकर यांनी दाखल केलेले दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात आले आहे.तर पुणे येथे पुणे येथे प्रशिक्षणार्थी काळात अंबर दिवा, पोलिस कारवाईत हस्ताक्षेपासह विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या खेडकर यांची थेट वाशिमला बदली करण्यात आली. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी म्हणून 11 जुलै रोजी रुजू झाल्या. पहिल्या दिवशी वाशिम जिल्हाधिकारी एस. बूवनेश्वरी यांची भेट घेऊन वाशिम जलसंपदा विभागासह 12 जुलै रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागात प्रशिक्षण घेतले. आता वाशिमनंतर पूजा खेडेकर यांची बदली अकोला येथे बदली करण्यात आली आहे.