Sunday, November 24, 2024
Homeराजकारणआता माफी नाहीच !कॉंग्रेसचा मोठा निर्णय ; 5 आमदारांना घरी पाठवणार

आता माफी नाहीच !कॉंग्रेसचा मोठा निर्णय ; 5 आमदारांना घरी पाठवणार

अकोला दिव्य ऑनलाईन : विधान परिषद निवडणुकीत पक्षादेश झुगारून विरोधात मतदान करणा-या कॉंग्रेस पक्षाच्या ५ आमदारांना सरळ घरचा रस्ता दाखविण्यास पक्षश्रेष्ठींनी हिरवा झेंडा दिला असून, येत्या सोमवारपर्यंत या पाचही आमदारांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई येथील सूत्रांनी दिली आहे.

विधानपरिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे काही आमदारांकडून भाजप महायुतीच्या उमेदवारांना आपलं मत देण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांच्यासाठी ३० मतांचा कोटा निर्धारित करुन उर्वरीत ७ मते ठाकरे सेनेचे मिलींद नार्वेकर यांच्यासाठी कायम केला. पक्षाच्या ३७ पैकी ३० आमदारांना सातव आणि ७ आमदारांना नार्वेकर यांना आदेश दिला होता. मात्र सातव यांना ३० पैकी २५ मते मिळाली. म्हणजे ५ आमदारांनी पक्ष आदेशाला झुगारून विरोधात मतदान केले. हे स्पष्ट झाले. या व्युहरचनेमुळे नेमक्या ५ आमदारांनी विरोधात मतदान केल्याचे स्पष्ट झाले.

पक्षश्रेष्ठींनी या कृत्याची गंभीरपणे दखल घेऊन, बांद्रा पुर्वचे आमदार झिशान सिद्दीकी, इगतपूरीचे आमदार खोसकर, नांदेडचे आमदार अंतापुरकर या तिघांसह ५ आमदारांना घरी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यातील ४ आमदार माजी मुख्यमंत्री व राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांचे समर्थक आहेत.ही बाब प्रदेश अध्यक्ष नाना पटोले देखील जाणून असल्याने त्यांनी प्रज्ञा सातव यांच्यासाठी ३० मतांचा कोटा निर्धारित करुन या आमदारांचा हेतुपुरस्सर ३० जणांमध्ये समावेश केला. जेणेकरून नार्वेकरांसोबत दगाफटका होणार नाही,याची खबरदारी घेतली. मतमोजणीत सातव यांना २५ मते मिळाली.तेव्हा ५ जणांनी अजित पवार व भाजप उमेदवाराला मतदान केल्याचे स्पष्ट झाले.

किमान या खबरदारीने उध्दव ठाकरे यांचा उमेदवार विजयी झाला. काँग्रेसचे ते फुटीर आमदार कोण, ज्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि भाजपाला मतदान केले, याची यादी पटोले यांनी दिल्लीला पाठविली आहे. तसेच या लोकांवर कारवाई करणार असल्याचेही स्पष्ट होत आहे. गेल्या निवडणुकीवेळी काही बदमाशांनी बदमाशी केली होती. तेव्हा ते सापडू शकले नव्हते.आता त्यांना पकडण्यासाठी सापळा लावला होता, त्यात ते सापडले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!