Wednesday, November 20, 2024
Homeशैक्षणिकसमर्थ एज्युकेशन संस्था' अकोलेकर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध - जयश्री नितीन बाठे

समर्थ एज्युकेशन संस्था’ अकोलेकर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध – जयश्री नितीन बाठे

अकोला दिव्य ऑनलाईन : प्रख्यात शिक्षणतज्ञ प्रा. नितीन बाठे यांनी स्थापन केलेल्या समर्थ एज्युकेशन संस्थेच्या समर्थ बीझी बिझ प्री प्रायमरी शाळेच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन संस्थेच्या आधारस्तंभ सुमनताई भास्करराव बाठे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था संचालिका व मराठी साहित्याच्या अभ्यासक प्रा. जयश्री बाठे होत्या.ज्येष्ठ संचालक तथा प्रशासक प्रा. राजेश बाठे, युवा नेतृत्व समर्थ बाठे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. विशेष अतिथी म्हणून आईसाहेब सुमनताई बाठे उपस्थित होत्या.

संस्थाध्यक्ष प्रा. नितीन बाठे यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करुन गोरक्षणरोड, कौलखेड, मलकापूर, खडकी भागातील विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षी नवीन शैक्षणिक सत्रात पहिलीपासून दहावीपर्यंत शाळा सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. पालकांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. जयश्री बाठे यांनी संत साहित्याचे महत्त्व विषद केले व त्यांचे आचरण प्रत्येकाच्या आयुष्यात किती महत्वाचे आहे हे अत्यंत ओघवत्या शैलीत सांगून ‘समर्थ एज्युकेशन संस्था’ ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शिक्षण व विकासासाठी वचनबद्ध असून प्रत्येक विद्यार्थ्यांला जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

आधुनिक शिक्षण प्रणालीसोबतच संस्कार व मूल्यांचा विसर पडता कामा नये असेही त्या म्हणाल्या. संस्थेचे संचालक किशोर कोरपे, किशोर रत्नपारखी, योगेश जोशी तसेच शैक्षणिक संचालक डॉ. जी. सी. राव यांनी विचार व्यक्त केले. शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व तसेच पाल्याच्या जडणघडणमध्ये पालकांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे मत व्यक्त केले.

संस्थेच्या शैक्षणिक संचालिका व समर्थ पब्लिक स्कूल, रणपिसे नगरच्या प्राचार्या सुवर्णा गुप्ता यांनी पालकांशी संवाद साधला. समर्थ बीझी बिझच्या प्राचार्या मुग्धा कळमकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन लीना घुमनानी तर आभारप्रदर्शन नेहा शर्मा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!