Sunday, September 8, 2024
Homeताज्या घडामोडीवादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरची अखेर वाशिमला बदली !

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरची अखेर वाशिमला बदली !

अकोला दिव्य ऑनलाईन : प्रशिक्षणार्थी म्हणून पुण्यात नियुक्ती करण्यात आलेल्या २०२३ बॅचच्या IAS अधिकारी पुजा खेडकर यांची अखेर वाशिम येथे बदली करण्यात आली. पुणे येथे नियुक्ती झाल्यापासूनच त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावले, स्वतःच्या खासगी गाडीवर लाल दिवा मिरवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगूनही पाहिले. मात्र तरीही वर्तणुकीत बदल झाला नाही. अखेर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहीत तक्रार केली आणि त्यानंतर प्रशिक्षणार्थी असलेल्या पूजा खेडकर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. 

पूजा खेडकर ३ जून रोजी पुणे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या. मात्र रुजू होण्यापूर्वीच त्यांनी जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांना व्हॉट्सअपद्वारे निरोप देऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, गाडी, निवासस्थान व शिपाई याबाबत वारंवार मागणी केली.

प्रत्यक्षात कोणत्याही आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांना दोन वर्षाचा प्रोबेशन काळ पूर्ण करावा लागतो. त्यादरम्यान त्यांना विविध विभागात काम करावे लागते. या सर्व कामाचा अनुभव आल्यानंतरच प्रत्यक्षात त्यांची नियुक्ती केली जाते. मात्र पूजा खेडकर यांनी प्रोबेशन काळातच जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांची जंत्रीच सुरू केली. इतकेच नाही तर पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी वाहनावर अंबर दिवा लावला असून तो दिवसादेखील चालू ठेवतात. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अँटीचेंबर देखील त्यांनी बळकावल्याचे जिल्हाधिकारी यांनी सचिवांकडे लिहिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. तसेच पूजा खेडकर यांच्या वडिलांचीही वर्तणूक चुकीची असल्याचे या तक्रार अर्जात म्हटले आहे. याबाबतचे काही whatsapp चॅट देखील यांनी यासोबत जोडले आहेत. अखेर या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या पूजा खेडकर यांची उचल बांगडी करण्यात आली आहे. 

पूजा खेडकर कोण आहेत? 

पूजा खेडकर या २०२३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील त्या रहिवाशी आहेत. माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या त्या कन्या आहेत. दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. तर त्यांचे आजोबा (आईचे वडील) जगन्नाथराव बुधवंत हे देखील आयएएस अधिकारी होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!