Sunday, September 8, 2024
Homeसामाजिकदेशाचे पहिले आचार्य अकोल्यात : स्वामी अवधेशानंद यांची भागवत कथा

देशाचे पहिले आचार्य अकोल्यात : स्वामी अवधेशानंद यांची भागवत कथा

अकोला दिव्य ऑनलाईन : राष्ट्राचे प्रथम आचार्यचा बहूमानप्राप्त अवधेशानंद महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून श्रीमद् भागवत कथा यज्ञाचे आयोजन 18 नोव्हेंबर 2024 पासून अकोला शहरातील मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. या भव्य दिव्य आयोजन संदर्भात श्री भागवत सेवा समितीची नियोजन बैठक झाली. ज्येष्ठ सनदी लेखापाल बी.एम.अग्रवाल यांच्या अध्यक्षतेत संपन्न या बैठकीत अवधेशानंद महाराज यांच्या कथा प्रवचनाच्या संदर्भात चर्चा व रूपरेषा मांडण्यात आली.

भागवत कथा शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी करण्यासाठी विविध उपसमित्या गठीत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तब्बल दहा वर्षानंतर अकोला व पंचक्रोशीतील भाविकांना स्वामी अवधेशानंद महाराजांच्या कथा श्रवणाचा लाभ सणासुदीच्या नोव्हेंबर महिन्यात मिळणार आहे.मुंगीलाल प्रांगणाला अध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा लाभला असून आतापर्यंत अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले आहेत. राष्ट्रातील अनेक ख्यातनाम व पावन विभूती, संत, महात्मे व वक्त्यांनी या मैदानावर आपली उपस्थिती दर्शवून हजारोंच्या संख्येने गर्दी मिळविली आहे.या वेळेसही स्वामी अवधेशानंद महाराज यांची उपस्थिती लाभत आहे.

सभेत सहभाग घेत उपस्थितांनी सुचना सांगितल्या. आपल्या अध्यक्षीय मनोगतात सीए बी.एम अग्रवाल यांनी आयोजन सफल करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. शैलेंद्र कागलीवाल यांनी आभार मानलेत.सभेला श्रीप्रकाश रुहाटिया, महेश खंडेलवाल, अनिल तापडिया, प्रकाश बजाज, कमलेश कोठारी, शिवप्रकाश मंत्री, जयंत पडगिलवार, उमेश बगडिया, सीए रमेश बाहेती, डॉ मनोज अग्रवाल, राम अवतार अग्रवाल, हेमेंद्र अग्रवाल, दीपक भरतीया, राजेश पालडीवाल, प्रा. एल आर शर्मा समवेत श्री भागवत सेवा समितीचे बहुसंख्य पदाधिकारी व सेवाधारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!