Sunday, September 8, 2024
Homeराजकारणअकोल्यात महादेव जानकरांनी सांगितली पुढची योजना ! आता मी डेफिनेटली बारामतीचा खासदार...

अकोल्यात महादेव जानकरांनी सांगितली पुढची योजना ! आता मी डेफिनेटली बारामतीचा खासदार होणार

अकोला दिव्य ऑनलाईन : पुढची लोकसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघामधून लढवणार असल्याची मोठी घोषणा रासपचे नेते महादेव जानकर यांनी केली.महादेव जानकर पुढे म्हणाले की, मी डेफिनेटली खासदार होणार आहे. बारामतीसाठी माझी तयारीही सुरु आहे.अकोला जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना महादेव जानकर यांनी ही घोषणा केली आहे.

आता पुढच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातूनच पुढचा निकाल लागणार आहे. मी महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढलो. नांदेड, सांगली, माढा, बारामती व परभणी मतदारसंघातून लोकसभा लढलो. मात्र, पाचही ठिकाणी माझा पराभव झाला. पण माझं मतदान लाखांनी वाढत चाललं आहे. कमी होत नाही. माझा रनरेट वाढत चालला आहे, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. जानकर पुढं म्हणाले की, पक्षालाही (रासप) मान्यता मिळत चालली आहे.

आज आपल्या पक्षाचा विधानसभेत आणि विधानपरिषदेत आमदार आहे. विदर्भात आम्ही कमी आहोत. मात्र, विदर्भातील वर्धा आणि गडचिरोलीमध्ये काही जिल्हा परिषद सदस्य आहेत. वर्ध्यामध्ये एक तर गडचिरोलीमध्ये ७ जिल्हा परिषद सदस्य आहेत. अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या ठिकाणी आपण शून्य आहोत. लोणारमध्ये एक नगरपालिका लढवली होती. पण तेथे यश मिळालं नाही, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघापैकी महायुतीला फक्त १७ जागा निवडून आणण्यात यश आलं. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला धक्का बसला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुक कळात परभणी लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता. परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून रासपचे नेते जानकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभाही घेतल्या होत्या. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी मोठ्या मताधिक्यांनी महादेव जानकरांचा पराभव केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!