अकोला दिव्य ऑनलाईन : पर्यावरणाचे महत्व लक्षात घेता कृषि दिनानिमित्त १ जुलैला वर्षामहोत्सवाचे आयोजन केले आणि पावसाचे आगमन अकोल्यात झाले, हे शुभसंकेत आहेत. कृषि क्षेत्राबाबतची पत्रकारिता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या कॉलेजच्या माध्यमातुन ही उत्तम संधी उपलब्ध आहे, असे मत कुलगुरू गडाख यांनी व्यक्त केले. वर्षा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जर्नालिझम अण्ड सोशल वर्क कॉलेजतर्फे वर्षा महोत्सवाचे आयोजन १ जुलै २०२४ रोजी करण्यात आले होते. सामाजिक जबाबदारीतून आयोजीत वर्षा महोत्सव कौतुकास्पद
आहे. असे मत उद्घाटक माजी आमदार तुकाराम बिडकर यांनी व्यक्त केले. डॉ.पीडीकेव्ही कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते विजेता स्पर्धकांना बक्षिस वितरण करून, महोत्सवाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा. मुकुंद भारसाखळे, सचिव अशोक इंगळे, कोषाध्यक्ष रमेश तायडे, संचालिका नंदाताई भारसाखळे, वंदना तायडे, पोलिस अधिकारी पी.टी इंगळे, कॉलेजचे अध्यक्ष डॉ. गणेश बोरकर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते पंकज जायले यांचा सत्कार करण्यात आला.वर्षा महोत्सवात आंतर महाविद्यालयीन गीतगायन, नृत्य स्पर्धा आणि गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार तसेच भविष्यात
रोजगार व नोकरीची संधी या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे परिक्षक म्हणुन ज्येष्ठ साहित्यीक उल्हास मोहोड, प्रा. राहुल घोडस्वार, गायक तुषार खंडेराव यांनी स्पर्धेचा निकाल जाहिर केला. सोनल पारेख (गीतगायन) रेश्मा वाहुरवाघ (नृत्य) आणि वैदिशा शेरेकर या विजेता स्पर्धकांना कुलगुरूंच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून सन्मानीत करण्यात आले. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या ७ वर्षाची बाल गायिका वैदिशा शेरेकर खास आकर्षण होते.
संस्थेचे अध्यक्ष प्रा मुकंद भारसाखळे व संचालिका वंदनाताई तायडे यांच्या जन्मदिनानिमित्त तुळस, बेल आणि पिंपळ अशा झाडांच्या ५०० रोपांचे विद्यार्थ्यांना निःशुल्क वाटप करून वाढदिवस साजरा केला. वर्षा महोत्सव यशस्वी करण्यासाठी संचालक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. कोमल चिमणकर यांनी केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली.