अकोला दिव्य ऑनलाईन : शहरातील शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांचं उत्कृष्ट भविष्य घडविण्यात निर्णायक सहभाग असलेल्या सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये शाळा सुरू होण्याचा आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे तिलकपूजन करीत संस्थेचे अध्यक्ष प्रदिपसिंह राजपूत आणि प्राचार्या मनिषा राजपूत यांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.
दुग्धशर्करा योग म्हणजे आज सन्मित्र पब्लिक स्कूलचा 18 वा वर्धापन दिन होता.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमेरिकेहून आलेले दिग्विजयसिंह राजपूत लाभले होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली.याप्रसंगी इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्यगित सादर केले. यामध्ये मानवी इंगळे, अरोही इंगळे, प्रियांशी वैद्य,गायत्री चारोडे, समृद्धी इंगोले व मनाली लोखंडे सहभागी झाल्या होत्या.
गीताचे संयोजन कृतिका गावंडे या विद्यार्थ्यांनी केले.यावेळी कविता व भाषणातून शाळेविषयी श्रवण वक्टे, संस्कृती भटकर, रिद्धी पवार, अदिती गावंडे, अंश ढोले, रिशिका जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले. सुंदर सजावट व रांगोळी धनश्री देशमुख, ईशा लासुरकर, तृप्ती अघडते या विद्यार्थ्यांनी केली होती.संस्थेचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत यांनी शाळा काढण्याचे बीज मनात केव्हा पासून स्फुरले ते आजतागायत संस्थेचा प्रवास कसा संघर्षमय राहिला व त्यावर मात करून आज आपण त्या कष्टाची व प्रगतीची फळे कसे चाखत आहोत असे सांगितले.
प्राचार्या राजपूत यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. सलग इयत्ता दहावीचा 100 टक्के निकाल, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा, खेळ, अभ्यास्पुरक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होत आहे.अशी माहिती दिली. शाळेच्या प्रथम दिनाचे व वर्धापन दिनाचे विशेष आकर्षण अमेरिकेहून आलेले पाहुणे दिग्विजयसिंह राजपूत होते अमेरिकेला कॅलिफोर्निया मध्ये एका नामांकित कंपनीत ते सिनियर प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून सेवेत आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्या.अमेरिकेची शिक्षण पद्धती, शिस्त,परीक्षेची मूल्यांकन पद्धती व प्रगती, व्यवसाय, वेळेचे महत्व आणि नव्याने आलेले आर्टिफिसल इंटेलिजेंसचे महत्व विशद केले. कठोर परिश्रमासोबतच आपल्या आयुष्याचे ध्येय जर निश्चित असेल तर यश तुमचेच आहे.
मोबाईलचा वापर आवश्यक त्या ठिकाणीच करावा. वाचनाचा छंद जोपसावा. विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी विविध विषयवार चर्चा केली. विद्यार्थ्यांची प्रगती व कार्यक्रमाचे सादरीकरण पाहून तुम्ही परदेशात जाण्यासाठी पात्र आहात. असे विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना दिग्विजयसिंह म्हणाले.कार्यक्रमाचे संचालन आदिती गावंडे व इशिका देशमुख यांनी केले. धनश्री देशमुख हिने आभारप्रदर्शन केले. सदाफळे, राऊत,यादव,आगरकर,दिपाली देशमुख,सुषमा देशमुख, खानझोडे, देशपांडे, उपष्याम आणि गाढे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.