अकोला दिव्य ऑनलाईन : ‘छावा’ संघटने तर्फे समाजोपयोगी कार्याचा एक भाग म्हणून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या मोहिमे अंतर्गत ग्राम सामदा येथील ७५ विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वितरण करण्याल आले आहे. रितेश मिर्झापुरे यांनी दप्तरे उपलब्ध करून दिली. सामदा येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात या दप्तरांचे वितरण करण्यात आहे. याप्रसंगी ‘छावा’चे जिल्हा प्रमुख शंकरराव वाकोडे, प्रसिध्दी प्रमुख प्रदीप खाडे, रितेश मिर्झापुरे, प्रमोदराव डुकरे पाटील, डॉ गावंडे, मनोहर मांगटे पाटील, अनिरुद्ध भाजीपाले, बबलू पाटीत वसु, दिपक बिहाडे, सचीन गावंडे आदीत्य वाकोडे उपस्थित होते.
प्रारंभी अतिथींच्या हस्ते हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, सेनापती तानाजी मालसुरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. छावा प्रमुख शंकरराव वाकोडे यांनी आपले व्यक्त करतांना सांगितले की, गरजवंतांना रक्त उपलब्ध व्हावे या करीता मोठे रक्तदान शिबीर घेण्यात ‘छावा’ महाराष्ट्रात आघाडीवर आहे. या समाजोपयोगी कार्यातील एक भाग म्हणून ग्रामीण भागातील गरजु विद्यार्थ्यांना शालेयपयोगी साहित्य वाटप करण्याचा संकल्प ‘छावा’ संघटनेने केला आहे.
त्यानुसार चांगल्या दर्जाची शालेय दप्तर वाटप करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. या शिवाय टिफीन बॉक्स, वॉटर बॅग, कंपास पेटी आदी साहित्य सुधा वाटप करण्याचे संघटनेने ठरविले आहे. सामदा येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन वस्ताद सतीश घाटे यांनी केले कार्यक्रमास बबलु तराळ, विठ्ठल सपकाळ, ज्ञानेश्वर राणे, विनोद भांडे यांच्यासह इतरही गांवकरी उपस्थित होते.